वृद्धाश्रमाठी बहिणीला ओवाळणीत दिली पाच गुंठे जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:04+5:302021-09-10T04:29:04+5:30

संगीता पवार यांनी तरुण उद्योजक विक्रांत पवार यांच्याकडे वृद्धाश्रम सुरू करण्याची संकल्पना बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आजी ...

He gave five gunthas of land to his sister in the old age home | वृद्धाश्रमाठी बहिणीला ओवाळणीत दिली पाच गुंठे जमीन

वृद्धाश्रमाठी बहिणीला ओवाळणीत दिली पाच गुंठे जमीन

संगीता पवार यांनी तरुण उद्योजक विक्रांत पवार यांच्याकडे वृद्धाश्रम सुरू करण्याची संकल्पना बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आजी कै. इंदुबाई भगवान पवार यांच्या स्मरणार्थ पाच गुंठे जागा देण्याचे अभिवचन दिले. विशेष म्हणजे रक्षाबंधन सणाला बहीण संगीता यांना भाऊरायाने ओवाळणी म्हणून ही भेट दिली.

यावेळी बागवान सोशल फाउंडेशनचे जुबेरभाई बागवान आणि इमामभाई लांडगे उपस्थित होते.

----

स्टँप पेपरवर दिले लिहून

१०० रुपयांच्या स्टॅंप पेपरवर यासंदर्भात तात्पुरती कागदोपत्री बाबही पूर्ण करण्यात आली. रक्ताच्या नात्यापेक्षा समाजात जपलेली नातीही अनेकदा श्रेष्ठ ठरतात, हेच माझा भाऊ विक्रांत दादा याने दाखवून दिल्याचे संगीता यांनी म्हटले आहे.

-----

०९बार्शी०१

वृद्धाश्रमासाठी बहीण संगीता पवार यांना ओवाळणीत पाच गुंठे जमीन स्टॅम्प पेपरवर देताना विक्रांत पाटील.

Web Title: He gave five gunthas of land to his sister in the old age home