झरेत पाइपलाइन फोडून ग्रामपंचायत निवडणुकीचा राग काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:22 IST2021-01-25T04:22:06+5:302021-01-25T04:22:06+5:30
करमाळा : झरे येथे ज्वारीला पाणी देण्यासाठी अंथरलेली पाइपलाइन फोडून ग्रामपंचायत निवडणुकीचा राग व्यक्त केल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात ...

झरेत पाइपलाइन फोडून ग्रामपंचायत निवडणुकीचा राग काढला
करमाळा : झरे येथे ज्वारीला पाणी देण्यासाठी अंथरलेली पाइपलाइन फोडून ग्रामपंचायत निवडणुकीचा राग व्यक्त केल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात झरे येथे घडला.
याबाबत कैलास सरोदे यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. या तोडफोडीत ३५ पीव्हीसी पाइपचे नुकसान झाले आहे. १५ जानेवारीच्या रात्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून अनोळखी व्यक्तीने हे कृत्य केले आहे.
कैलास सरोदे १६ जानेवारी रोजी सकाळी ज्वारीला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता पाइप फोडल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्याच्या या नुकसानीबाबत बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष ओहोळ यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
---
फोटो : २३ करमाळा क्राईम
झरे येथे कैलास सरोदे यांच्या शेतातील प्लॅस्टिकच्या पाइपची अनोळखी व्यक्तीने तोडफोड केली.