He broke into a house in Bhalgaon and stole jewelery worth Rs 3 lakh | भालगाव येथे घर फोडून तीन लाखांचे दागिने पळविले

भालगाव येथे घर फोडून तीन लाखांचे दागिने पळविले

वैराग : भालगाव (ता. बार्शी) रात्री घरात झोपल्यावर चोरट्यांनी कडी, कुलूप तोडून कपाटीतील रोख रकमेसह सोने व धातूचे दागिने, असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल पळविला.

ही घटना रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली असून, याबाबत गोपीनाथ नवनाथ दराडे (वय ४९, रा. भालगाव, तालुका बार्शी) यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गोपीनाथ दराडे हे घराचे बांधकाम काढल्याने चुलतीच्या घरी राहत होते.

शनिवार सायंकाळी काम संपवून घरी आले आणि रात्री ११ वाजता जेवण आटोपून दरवाजा बाहेरून बंद केला. त्यास कडी कुलूप लावून झोपी गेले. पहाटे ५ वाजेच्या सुमारास पत्नी जयश्री दराडे ही झाडलेट करण्यासाठी उठली असता तिला खोलीचे कुलूप दिसून आले नाही. कपाट उघडे आणि आत डोकावले असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी एक लाख ८० हजार रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या, गंठण, असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला. अधिक तपास पोलीस सहायक निरीक्षक महारुद्रा परजणे करीत आहेत.

Web Title: He broke into a house in Bhalgaon and stole jewelery worth Rs 3 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.