उसने पैशांवरून एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:21 IST2021-05-22T04:21:14+5:302021-05-22T04:21:14+5:30
सांगोला-भारत गल्ली येथील अमरजीत भगवात सोनवणे हा गुरुवारी भीमनगर येथील स्वप्निल समरजीत बनसोडे याच्याबरोबर बोलत-बोलत एखतपूर रस्त्याने लिंगे ...

उसने पैशांवरून एकाला मारहाण
सांगोला-भारत गल्ली येथील अमरजीत भगवात सोनवणे हा गुरुवारी भीमनगर येथील स्वप्निल समरजीत बनसोडे याच्याबरोबर बोलत-बोलत एखतपूर रस्त्याने लिंगे मळ्याजवळ गेला. त्या ठिकाणी स्वप्निल बनसोडे यांनी तुला चार महिन्यापूर्वी उसने दिलेले ७ हजार रुपये कधी देणार म्हणून विचारणा केली. त्यावेळी अमरजीत याने सध्या लाॅकडाऊनमुळे कामधंदा नाही, माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत, थोडे दिवस थांब, काम धंदा मिळाला की तुझे पैसे देतो, असे सांगितले. यावेळी त्याने मला काही सांगू नकोस, माझे ७ हजार रूपये आत्ताच्या आत्ता दे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी त्याने चिलारीची काठीने त्याच्या मांडीवर, पोटरीवर, गुडघ्यांवर व उजव्या हाताच्या कोपऱ्याखाली मारहाण केली. याबाबत अमरजीत सोनवणे यांनी स्वप्निल बनसोडे याच्याविरुद्ध फिर्याद दिली.