लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी ठेवले संबंध; पीडिता राहिली गरोदर
By विलास जळकोटकर | Updated: June 6, 2023 17:43 IST2023-06-06T17:41:29+5:302023-06-06T17:43:19+5:30
ओळखीचं रुपांतर प्रेमात, तीन महिन्यापासून मासिक पाळी न आल्याने पिडितेच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेऊन तपासले असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.

लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी ठेवले संबंध; पीडिता राहिली गरोदर
सोलापूर - शेजारी असल्याची संधी साधून अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे जाळे टाकून ओळख वाढवली आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यातून पीडिता गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत निष्पन्न झाले. ६, १५, २७ फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी सागर नागनाथ तुकमाळी (वय- २१) या तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळ कायद्यान्वये व भां. दं. वि. ३७६ अन्वये गुन्हा नोंदला आहे. यातील पडिता आरोपीच्या घराजवळ राहण्यास आहे.
आरोपीने तिची ओळख वाढवून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. ६ फेब्रुवारी रोजी ‘तु मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करणार आहे’ असे सांगून तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले. असा प्रकार १५ व २७ फेब्रुवारी २३ रोजीही घडला. एके दिवशी आईने आरोपीकडे का जातेस म्हणून रागावल्याने दोघांचे बोलणे बंद झाले. यानंतर तीन महिन्यापासून मासिक पाळी न आल्याने पिडितेच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेऊन तपासले असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. पिडितेच्या आईने यासंबंधी विचारणा केल्यानंतर तिने आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केल्याचे सांगितले. यावरुन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्याने सागर तुकमाळी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.