शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

सुखी जीवन हवंय ?; मग विचार बदला : प्रल्हाद पै, जीवन विद्या मिशनतर्फे प्रेरणादायी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:00 IST

तुम्हाला जर जीवन सुखी आणि समृध्द करायचे असेल तर विचार बदला...जीवनाला आकार देण्यासाठी मनाला वश करा, असे प्रेरणादायी प्रबोधन आज जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या जीवन व्यवस्थापन मालिकेतील २२ वा कार्यक्रम सायंकाळी येथील हुतात्मा स्मृती मंदिरात झाला.

ठळक मुद्देउच्चविद्याविभूषित असलेल्या प्रल्हादजींकडे जीवन विद्या मिशनचे नेतृत्वएक मन हातात आले म्हणजे आपला प्रपंच सुखाचा आणि उत्कर्षाचा होईलआपण दिवसभरात  ६० हजार विचारांना जन्म देत असतो

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : तुम्हाला जर जीवन सुखी आणि समृध्द करायचे असेल तर विचार बदला...जीवनाला आकार देण्यासाठी मनाला वश करा, असे प्रेरणादायी प्रबोधन आज जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या जीवन व्यवस्थापन मालिकेतील २२ वा कार्यक्रम सायंकाळी येथील हुतात्मा स्मृती मंदिरात झाला.प्रल्हाद पै हे सद्गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र आहेत. उच्चविद्याविभूषित असलेल्या प्रल्हादजींकडे जीवन विद्या मिशनचे नेतृत्व आहे. त्यांना ऐकण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती; पण अतिशय शिस्तबध्द व्यवस्थेमुळे सर्वांना हा कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐकता आला. ‘विचार देई जीवना आकार’ हा पै यांच्या मार्गदर्शनाचा विषय होता. मन म्हणजे काय?  मनाचे प्रकार, त्याचे महत्त्व, विचार आणि त्यामुळे जीवनात येणारे सकारात्मक परिवर्तन, याबाबत प्रल्हाद यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मन हे आपल्या हातात आले पाहिजे. आपण मनाच्या खूपच आहारी गेलो आहोत. त्याच्यावर नियंत्रण मिळविले पाहिजे. एक मन हातात आले म्हणजे आपला प्रपंच सुखाचा आणि उत्कर्षाचा होईल.बहिर्मन आणि अंतर्मन हे मनाचे दोन प्रकार आहेत. हे दोन्हीही मनं जीवनात गोंधळ घालत असतात. त्यांना शिस्त लावली पाहिजे. आपण दिवसभरात  ६० हजार विचारांना जन्म देत असतो. हे सारे विचार बहिर्मनात चाललेले असतात. अंतर्मन आपोआप विचार करते आणि बहिर्मनाच्या विचारांना तथास्तू म्हणते. एखादी गोष्ट आपणाला साकारायची असल्यास त्या गोष्टीचा बहिर्मनात आलेला विचार अंतर्मनाला पटला पाहिजे. दोन्ही  मनांचे एकमत झाल्यावर ती गोष्ट साकार होते. यावरून आपल्या जीवनात जे जे घडते ते ते सारे विचारातूनच आकार घेते, हे स्पष्ट होते. त्यामुळे आपण प्रत्येकानेच आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला शिकले पाहिजे, असे ते म्हणाले.माणसाचे अंतर्मन आणि बहिर्मन नेहमीच आत्मशक्तीच्या रूपात असते, असे सांगून पै यांनी अंतर्मनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, या मनावरील श्रध्दा वाढविल्यास तुम्हाला जीवनात जे जे साकार करायचे ते सारे मिळेल; पण यासाठी आपल्या क्षमतेनुसार मागा. आशावादी राहा. जे साकार करायचे आहे, त्याच्या विचारांची उजळणी करत चला आणि साकार झाल्यानंतर ते यश साजरे करा.जीवनात सारे काही विचारांमुळेच घडत असल्यामुळे प्रत्येकानेच चांगला आणि सहकारात्मक विचार केला पाहिजे. विचार पाहत असताना एखादा वाईट विचार आला तर त्याला थांबवून सकारात्मक विचार केला पाहिजे. अंतर्मनालाही नेहमीच सकारात्मक संदेश द्यायला हवेत. विचारांना कल्पना आणि भावनांचे खतपाणी घातले पाहिजे, असेही ते म्हणाले.------------------उत्तम विचारांचे फायदेउत्तम विचारांचा नेहमी तन, मन,धन, वन आणि जनांवर सकारात्मक परिणाम होतो. चांगल्या विचारांमुळे आपले आरोग्य चांगले राहील याशिवाय मन सुदृढ होईल. तुमचे उत्पन्न वाढून श्रीमंती येईल. चांगल्या विचारांमुळे विचारांचे प्रदूषण दूर होईल आणि विश्वशांती नांदेल, असे प्रल्हाद पै यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर