बार्शीत विवाहित महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:19 IST2021-04-26T04:19:59+5:302021-04-26T04:19:59+5:30

याबाबत पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादित म्हटले आहे, ही घटना घडली, तेव्हा तिचा पती पाणी ...

Harassment of a married woman in Barshi | बार्शीत विवाहित महिलेचा विनयभंग

बार्शीत विवाहित महिलेचा विनयभंग

याबाबत पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादित म्हटले आहे, ही घटना घडली, तेव्हा तिचा पती पाणी आणण्यासाठी घराबाहेर, तर सासरेही दुकानात व सासूही कपडे धुण्यासाठी बाहेर गेली होती. तेव्हा ती एकटीच घरी होती. त्यावेळी शिवाजी दत्तात्रय घेमांड याने तिच्या पतीला हाक मारली असता, तिने घरी नसल्याचे सांगताच तो घरात घुसून विनयभंग केला. तिने आरडाओरड करीत त्याच्या डोळ्यावर बुक्की मारताच तो पळून गेला. पती घरी येताच, पीडित महिलेने ही घटना सांगितली. त्यानंतर, पतीसोबत येऊन तिने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, शिवाजी घेमांड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Harassment of a married woman in Barshi