माहेरच्या शेतजमिनीत हिस्सा मागण्यासाठी पतीसह मुलांकडूृन छळ; महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:37 IST2020-12-16T04:37:35+5:302020-12-16T04:37:35+5:30
याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात पती भाऊराव गोरे, मुले सागर गोरे, आकाश गोरे, दीर राजकुमार गोरे व जाऊ रंजना गोरे ...

माहेरच्या शेतजमिनीत हिस्सा मागण्यासाठी पतीसह मुलांकडूृन छळ; महिलेची आत्महत्या
याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात पती भाऊराव गोरे, मुले सागर गोरे, आकाश गोरे, दीर राजकुमार गोरे व जाऊ रंजना गोरे (सर्वजण रा.घाटणे, ता.माढा) या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची फिर्याद भावजय रत्नप्रभा मारुती जगदाळे (रा.माढा) यांनी दिली आहे.
पोलीस सूत्रांनुसार मयत अलका गोरे हीस लग्नानंतर काही वर्षांनी माहेरच्या शेतजमिनीत हिस्सा मागण्यासाठी पतीसह मुलांकडून छळ सुरू होता. यामुळे पती तिला मारहाण करत असे. १८ आक्टोबर रोजीही असाच त्रास झाल्याने याबाबत कुर्डुवाडी पोलिसांत ४९८,३२७ प्रमाणे संबंधित सर्व आरोपींच्या विरोधात मृत महिलेने गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी करण्यात आली. या छळाला कंटाळून सोमवारी ही आत्महत्येची घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-----१५अलका गोरे