महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:29 IST2021-09-16T04:29:01+5:302021-09-16T04:29:01+5:30
महाराष्ट्रात वारंवार महिलांवर तसेच मुंबईच्या साकीनाका भागातील एका महिलेवर अमानुष अत्याचार करून तिच्या गुप्तांगावर वार करून तिला ...

महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या
महाराष्ट्रात वारंवार महिलांवर तसेच मुंबईच्या साकीनाका भागातील एका महिलेवर अमानुष अत्याचार करून तिच्या गुप्तांगावर वार करून तिला गंभीर जखमी केले होते. या महिलेवर उपचार सुरू असताना ती मयत झाली. या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असली तरी लैंगिक अत्याचाराच्या केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे. गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्रमध्ये मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातील सहा वर्षांच्या मुलीवर, तसेच सतरा वर्षांच्या मुलीवर, तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेले आहे. तसेच पोलीस प्रशासनाच्या कायद्याची भीती समाजात कमी होऊ लागल्याने व महिला व युवतीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पद्मजा काळे, शैलजा गिते, सुगंधा आगवणे व इतर महिला भगिनी उपस्थित होते.