शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

केवळ दोन दिवसांत अर्धा कोटीचे ‘नो-व्हेईकल झोन’मुळे नुकसान !

By appasaheb.patil | Updated: December 18, 2019 13:17 IST

सोलापूरच्या नवीपेठेतील व्यापारी संकटात; लोकप्रतिनिधींनीही केला विरोध

ठळक मुद्देवाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी नवीपेठेत नो-व्हेईकल झोनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली या निर्णयामुळे नवीपेठेत खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवलीनवीपेठेत येणाºया सर्वच बाजूचे रस्ते बंद केल्यामुळे ग्राहकांनी नवीपेठेत खरेदीस येण्याचे टाळले़

सोलापूर : वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी नवीपेठेत नो-व्हेईकल झोनची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ दुसºया दिवशीही नो-व्हेईकल झोनची पोलिसांकडून अंमलबजावणी करण्यात आली़ या निर्णयामुळे नवीपेठेत खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवली असून, दोन दिवसांत साधारण: अर्धा कोेटी (५० लाख) रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नवीपेठ असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोलापूरची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाºया नवीपेठेतील समस्यांवर लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेची दखल घेऊन शहर पोलिसांनी तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली़ वास्तविक पाहता अतिक्रमण, स्वच्छतागृह, अस्वच्छ बाजारपेठ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते आदी प्राथमिक समस्या सोडविणे अपेक्षित असताना पोलिसांनी सुरुवातीला वाहतूक समस्या सोडविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत़ वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे नवीपेठेतील मुख्य बाजारात एकही दुचाकी आली नाही़ शिवाय नवीपेठेत येणाºया सर्वच बाजूचे रस्ते बंद केल्यामुळे ग्राहकांनी नवीपेठेत खरेदीस येण्याचे टाळले़ त्यामुळे नवीपेठेत सोमवार व मंगळवारी दिवसभर शुकशुकाट दिसून येत होता़ नवीपेठेत लहान व मोठे मिळून ४५० ते ५१५ दुकाने आहेत़ याशिवाय खोकेधारक, हातगाडीचालक, चहावाले, फेरीवाले, किरकोळ विक्रेते, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, रिक्षा थांबे आदींच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याची माहिती व्यापाºयांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़ 

व्यापारी व पोलिसांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच शहर पोलिसांनी नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी नवीपेठेत सुरू केली आहे़ आता व्यापारी आम्ही नो-व्हेईकलबद्दल काहीच बोललो नव्हतो असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे़ प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली अंमलबजावणी सुरूच राहणार आहे़ त्यात काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात येतील़ आज व्यापाºयांना चर्चेसाठी बोलावले आहे त्यात काही मार्ग निघेल.- डॉ. वैशाली कडूकर,पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर पोलीस

नवीपेठेत झाली व्यापाºयांची बैठक- वास्तविक पाहता नवीपेठेतील रस्ते, अतिक्रमण, स्वच्छतागृह, अस्वच्छता, दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याचा अभाव, लाईटची व्यवस्था, महिला ग्राहक व कामगार युवतींसाठीचे स्वच्छतागृह, पार्किंगची व्यवस्था, सुरक्षितता आदी समस्या व प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा शहर पोलिसांनी वाहतूक समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे़ तीही समस्या सोडविताना व्यापाºयांना विश्वासात न घेता नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी सुरू केली़ त्यामुळे व्यापाºयांचे नुकसान होत असल्याचे दिसताच या पोलिसांच्या निर्णयाविरोधात विचारविनिमय करण्यासाठी नवीपेठ व्यापारी असोसिएशनची तातडीची बैठक झाली़ या बैठकीत पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याचे ठरले तर चर्चेत मार्ग नाही निघाल्यास पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय ठरविण्यात येईल, अशी माहिती नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे विजय पुकाळे यांनी दिली.

खोकेधारकांवर ओढवले संकट- ग्राहकांना लागणाºया किरकोळ साहित्य विक्रीस ठेवणाºया खोकेधारक व हातगाडीवरील विक्रेत्यांना या नो-व्हेईकल झोनचा मोठा फटका बसला आहे़ मागील दोन दिवसांत १० टक्केही व्यवसाय झाला नसल्याचे सांगण्यात आले़ एवढेच नव्हे तर पिग्मी, बँकेचा हप्ता भरण्यासाठी लागणारे पैसे देण्यापुरताही व्यवसाय झाला नसल्याची खंत खोकेधारक संघटनेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली़ 

बोळ झाले गाड्यांनी पॅक़...- नवीपेठेत नो-व्हेईकल झोनची अंमलबजावणी सुरू केली़ नवीपेठेत येणारे सर्वच रस्ते बंद केले़ यात काही बोळांचा समावेश आहे़ यातील बहुतांश बोळ हे दुचाकीस्वारांनी पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे पॅक झाले़यात दिवेकर बेकरी, हुतात्मा बाग रोड, अ‍ॅड़ धनंजय माने घरासमोरील जागा, दर्बी कलेक्शन, पारस इस्टेट आदी बोळांमध्ये दुचाकीस्वारांनी गाड्या लावल्या आहेत़ यामुळे हे बोळ गाड्यांनी पॅक झाल्याचेही ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस