केवळ दोन दिवसांत अर्धा कोटीचे ‘नो-व्हेईकल झोन’मुळे नुकसान !

By appasaheb.patil | Published: December 18, 2019 01:14 PM2019-12-18T13:14:31+5:302019-12-18T13:17:01+5:30

सोलापूरच्या नवीपेठेतील व्यापारी संकटात; लोकप्रतिनिधींनीही केला विरोध

Half crore 'no-vehicle zone' damage in just two days! | केवळ दोन दिवसांत अर्धा कोटीचे ‘नो-व्हेईकल झोन’मुळे नुकसान !

केवळ दोन दिवसांत अर्धा कोटीचे ‘नो-व्हेईकल झोन’मुळे नुकसान !

Next
ठळक मुद्देवाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी नवीपेठेत नो-व्हेईकल झोनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली या निर्णयामुळे नवीपेठेत खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवलीनवीपेठेत येणाºया सर्वच बाजूचे रस्ते बंद केल्यामुळे ग्राहकांनी नवीपेठेत खरेदीस येण्याचे टाळले़

सोलापूर : वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी नवीपेठेत नो-व्हेईकल झोनची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ दुसºया दिवशीही नो-व्हेईकल झोनची पोलिसांकडून अंमलबजावणी करण्यात आली़ या निर्णयामुळे नवीपेठेत खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवली असून, दोन दिवसांत साधारण: अर्धा कोेटी (५० लाख) रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नवीपेठ असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोलापूरची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाºया नवीपेठेतील समस्यांवर लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेची दखल घेऊन शहर पोलिसांनी तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली़ वास्तविक पाहता अतिक्रमण, स्वच्छतागृह, अस्वच्छ बाजारपेठ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते आदी प्राथमिक समस्या सोडविणे अपेक्षित असताना पोलिसांनी सुरुवातीला वाहतूक समस्या सोडविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत़ वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे नवीपेठेतील मुख्य बाजारात एकही दुचाकी आली नाही़ शिवाय नवीपेठेत येणाºया सर्वच बाजूचे रस्ते बंद केल्यामुळे ग्राहकांनी नवीपेठेत खरेदीस येण्याचे टाळले़ त्यामुळे नवीपेठेत सोमवार व मंगळवारी दिवसभर शुकशुकाट दिसून येत होता़ नवीपेठेत लहान व मोठे मिळून ४५० ते ५१५ दुकाने आहेत़ याशिवाय खोकेधारक, हातगाडीचालक, चहावाले, फेरीवाले, किरकोळ विक्रेते, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, रिक्षा थांबे आदींच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याची माहिती व्यापाºयांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़ 

व्यापारी व पोलिसांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच शहर पोलिसांनी नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी नवीपेठेत सुरू केली आहे़ आता व्यापारी आम्ही नो-व्हेईकलबद्दल काहीच बोललो नव्हतो असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे़ प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली अंमलबजावणी सुरूच राहणार आहे़ त्यात काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात येतील़ आज व्यापाºयांना चर्चेसाठी बोलावले आहे त्यात काही मार्ग निघेल.
- डॉ. वैशाली कडूकर,
पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर पोलीस

नवीपेठेत झाली व्यापाºयांची बैठक
- वास्तविक पाहता नवीपेठेतील रस्ते, अतिक्रमण, स्वच्छतागृह, अस्वच्छता, दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याचा अभाव, लाईटची व्यवस्था, महिला ग्राहक व कामगार युवतींसाठीचे स्वच्छतागृह, पार्किंगची व्यवस्था, सुरक्षितता आदी समस्या व प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा शहर पोलिसांनी वाहतूक समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे़ तीही समस्या सोडविताना व्यापाºयांना विश्वासात न घेता नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी सुरू केली़ त्यामुळे व्यापाºयांचे नुकसान होत असल्याचे दिसताच या पोलिसांच्या निर्णयाविरोधात विचारविनिमय करण्यासाठी नवीपेठ व्यापारी असोसिएशनची तातडीची बैठक झाली़ या बैठकीत पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याचे ठरले तर चर्चेत मार्ग नाही निघाल्यास पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय ठरविण्यात येईल, अशी माहिती नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे विजय पुकाळे यांनी दिली.

खोकेधारकांवर ओढवले संकट
- ग्राहकांना लागणाºया किरकोळ साहित्य विक्रीस ठेवणाºया खोकेधारक व हातगाडीवरील विक्रेत्यांना या नो-व्हेईकल झोनचा मोठा फटका बसला आहे़ मागील दोन दिवसांत १० टक्केही व्यवसाय झाला नसल्याचे सांगण्यात आले़ एवढेच नव्हे तर पिग्मी, बँकेचा हप्ता भरण्यासाठी लागणारे पैसे देण्यापुरताही व्यवसाय झाला नसल्याची खंत खोकेधारक संघटनेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली़ 

बोळ झाले गाड्यांनी पॅक़...
- नवीपेठेत नो-व्हेईकल झोनची अंमलबजावणी सुरू केली़ नवीपेठेत येणारे सर्वच रस्ते बंद केले़ यात काही बोळांचा समावेश आहे़ यातील बहुतांश बोळ हे दुचाकीस्वारांनी पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे पॅक झाले़यात दिवेकर बेकरी, हुतात्मा बाग रोड, अ‍ॅड़ धनंजय माने घरासमोरील जागा, दर्बी कलेक्शन, पारस इस्टेट आदी बोळांमध्ये दुचाकीस्वारांनी गाड्या लावल्या आहेत़ यामुळे हे बोळ गाड्यांनी पॅक झाल्याचेही ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले़ 

Web Title: Half crore 'no-vehicle zone' damage in just two days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.