शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सोमवारी रात्री पकडला लाखोंचा गुटखा, दुस-या दिवसी दाखल झाला गुन्हा

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 25, 2023 21:02 IST

कारीत कारवाई : साडेपाच लाखांच्या मसाल्यासह वाहन पकडले

सोलापूर : पांगरी पोलीस स्टेशन हद्दीत कारी येथे गुटखा आणि सुगंधीत मसाल्याने भरलेले वाहन एका पत्र्याच्या शेडजवळ थांबलेल्या अवस्थेत पोलिसांनी पकडले. सोमवार, २४ जुलै रात्री ८.३० वाजेदरम्यान झालेल्या कारवाईबाबत दुस-या दिवसी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू राहिली. या कारवाईत ५ लाख ५६ हजारांचा गुटखा, सुगंधीत मसाला असा प्रतिबंधीत अन्नसाठा पोलिसांनी पकडला आणि तो पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आला.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार गुटख्यांनी भरलेला एक टेम्पो कारी येथे गणेश विधाते यांच्या पत्रा शेडच्या गोडाऊन जवळ उभा होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास येथे धाव घेतली. या कारवाईत ४ लाख ६० हजारांचा १२ पोती सुंगधीत मसाला, ९६ हजारांचा दहा पाेती जाफराणी जर्दा असा एकूण पाच लाख ५६ हजाराचा प्रतिबंधीत अन्नसाठा टेम्पोसह पोलिसांनी जप्त केला.

या कारवाईनंतर पोलिसांनी सोलापूरमधील अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती दिली. मात्र मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि रात्रीत गुन्हा दाखल झाला.पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस नायक संदेश पवार, पोलीस काँन्स्टेबल बाळकृष्ण मुठाळ यांनी सहभाग नोंदवला.

 मंगळवारी सायंकाळी पांगरी पोलिसात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आणि गणेश विधाते रा.कारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक  शिवाजी जायपत्रे करत आहेत .

टॅग्स :Solapurसोलापूर