बार्शीत ३ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:04+5:302021-02-05T06:44:04+5:30

बार्शी : शहराच्या मध्य वस्तीत लता टॉकीजजवळील एका खोलीमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवल्याचे समजताच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ...

Gutka worth Rs 3 lakh seized in Barshi | बार्शीत ३ लाखांचा गुटखा जप्त

बार्शीत ३ लाखांचा गुटखा जप्त

बार्शी : शहराच्या मध्य वस्तीत लता टॉकीजजवळील एका खोलीमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवल्याचे समजताच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने धाड टाकली. या कारवाईत गुटखा, पानमसाला, जाफरानी जर्दा असा २ लाख ९६ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

गुरुवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनच्या अधिकारी नसरीन मुजावर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी जाकीर मुस्तफा चौधरी (रा. राऊळ गल्ली, बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात सुगंधित सुपारीसह गुटखा विक्रीला बंदी असताना बार्शी शहरात त्याचा साठा केल्याची माहिती मिळताच सहआयुक्त मुजावर, सहायक फौजदार काशीद यांनी लता टॉकीज परिसरात धाड टाकून किराणा दुकानाच्या मागे गुटख्याचा साठा जप्त केला. या कारवाईत तीन गोण्या बादशाह गुटखा, राजनिवास पानमसाला ३१ गोण्या आणि ३२ गोण्या जाफरानी जर्दा पकडला. अधिक तपास सहायक फौजदार अमित वरपे करत आहेत.

Web Title: Gutka worth Rs 3 lakh seized in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.