विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गावोगावच्या शाळेचे गुरुजी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:43+5:302021-02-05T06:44:43+5:30

शासनामार्फत सर्व जिल्ह्यातील प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार मोहोळ तालुक्यातील शाळांची स्वच्छता ...

Guruji of Gavogaon school ready to welcome the students | विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गावोगावच्या शाळेचे गुरुजी सज्ज

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गावोगावच्या शाळेचे गुरुजी सज्ज

शासनामार्फत सर्व जिल्ह्यातील प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार मोहोळ तालुक्यातील शाळांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन चे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. वर्ग खोल्यांची स्वच्छता करून फवारणी केलेली आहे. तसेच सोमवारी सकाळी विद्यार्थी व पालकांची जनजागृती रॅली काढण्यात आली. सर्व नियमांचे पालन करून जास्तीत जास्त विद्यार्थी पटसंख्या असलेल्या ठिकाणी ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असून कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी विद्यार्थी उपस्थितीचे बंधन असणार नसल्याचे निम्बर्गी यांनी सांगितले.

मोहोळ तालुक्यामध्ये पाचवी ते आठवीच्या एकूण १५३ शाळा सुरू करण्यात येत आहेत. या शाळांना असणाऱ्या १५१४ शिक्षकांपैकी १२८५ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्या सर्व निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. पाचवी ते आठवी मध्ये एकूण १८८४३ विद्यार्थी पटसंख्या असून, या सर्वांची आसन व्यवस्था ची सोय केलेली आहे. यामुळे पालकांनीही आवश्यक ते सर्व नियमांचे पालन करून न घाबरता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असेही यावेळी सिद्धेश्वर निम्बर्गी यांनी सांगितले.

यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी राजशेखर नागणसूर मल्लिकार्जुन स्वामी विकास यादव आदी उपस्थित होते.

Web Title: Guruji of Gavogaon school ready to welcome the students