शिक्षण परिषदेतून बदलत्या शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:25 IST2021-01-16T04:25:27+5:302021-01-16T04:25:27+5:30
अक्कलकोट : तालुक्यातील नागणसूर केंद्राचे जानेवारी महिन्याची शिक्षण परिषद नागणसूर येथील एच. जी. प्रचंडे हायस्कूल नागणसूर येथे झाली. ...

शिक्षण परिषदेतून बदलत्या शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन
अक्कलकोट : तालुक्यातील नागणसूर केंद्राचे जानेवारी महिन्याची शिक्षण परिषद नागणसूर येथील एच. जी. प्रचंडे हायस्कूल नागणसूर येथे झाली. या परिषदेत बदलत्या शैक्षणिक धोरणांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषेच्या अध्यक्षस्थानी नागणसूर केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुनाथ नरुणे होते. यावेळी केंद्रप्रमुख गुरुनाथ नरुणे, प्राचार्य महादेव लिबिंतोटे, बीआरसी विषयतज्ज्ञ विशाल शेटे, शरणप्पा फुलारी, पुंडलिक कलखांबकर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकेतून केंद्रप्रमुखांनी ऑनलाईन शिक्षण, विविध शासकीय योजना, उपक्रम व नियोजन या विषयी मार्गदर्शन केले.
कलखांबकर यांनी ऑनलाईन परीक्षा प्रवेश बाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. शरणप्पा फुलारी यांनी नवोपक्रम लेखन या विषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले. उपाधे यांनी शैक्षणिक ऑनलाईन माहिती कसे भरावे या विषयी मार्गदर्शन केले. तर राजश्री कल्याण यांनी इंग्रजी विषयात टेक्निक वापरून सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना कसे शिकवावे तर विषयतज्ज्ञ विशाल शेटे यांनी शासकीय विविध योजनांचा लाभ कसे घ्यावा यावर मार्गदर्शन केले.
याशिवाय मुख्याध्यापकांनी वर्षभरात ऑननलाईन शिक्षण, उपक्रम, विविध योजना,शालेय गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या विविध उपक्रमा विषयी आढावा सादर केला.
फोटो
शिक्षण परिषद प्रसंगी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शरणप्पा फुलारी