शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्र्यांनी सोडवला चार गावाच्या पाण्याचा प्रश्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:41 IST

ऑनलाइन निवेदनाची घेतली दखल; सुपली, पळशी, उपरी व भंडीशेगावचा पाणी प्रश्न मिटला...!!

पंढरपूर :-  होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पंढरपूर तालुक्यातील उपरी, पळशी, सुपली, भंडिशेगाव या चार गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. याबाबत उपरी गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे आॅनलाईन निवेदन पाठवून मागणी केली होती.उजनी उजव्या कालव्यावर असणार्‍या कासाळगंगा ओढ्यावर सुपली, पळशी, उपरी व भंडीशेगाव याठिकाणचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना, कासाळगंगा ओढ्यातील पाणी पुर्णपणे आटले होते.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता.यासंदर्भात उपरी ग्रामपंचायतच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आॅनलाईन निवेदन पाठवून, कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आ. शहाजीबापू पाटील, आ. प्रशांत परिचारक यांच्याकडेही निवेदन दिले होते. सदर मागणी पालकमंत्री आव्हाड यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांनी सहकार्य करुन, सदर प्रश्नाचे गांर्भीय पालकमंत्र्यांच्या कानावर घातले. डाॅ. आव्हाड यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्यात आले असून उपरी,पळशी,सुपली व भंडिशेगाव या चार गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळJitendra Awhadजितेंद्र आव्हाड