शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील वाढती विषमता हीच देशातील मंदीचे कारण : अच्युत गोडबोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:18 IST

‘लोकमत’ शी साधला संवाद; १ टक्के लोकांकडे आहे ५८ टक्के संपत्ती

ठळक मुद्देशिक्षण, आरोग्य क्षेत्रात जीडीपीच्या तुलनेमध्ये कमी खर्च केल्यामुळे याचा फटका देशाला बसत आहे - अच्युत गोडबोलेदेशातील ४१.५ टक्के लोक शाळेत कधी गेलेच नाहीत, ५८ टक्के महिला ३३ टक्के पुरुष कधीच शाळेला गेले नाहीत - अच्युत गोडबोले

सोलापूर : जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर याचा फायदा खूप कमी लोकांना झाला़ जागतिकीकरणामुळे आपले लक्ष फक्त शहराकडे गेले. यामुळे रोजगार वाढला नाही, जीडीपीमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही़ यामुळेच बेकारी, विषमता, प्रदूषण हे तीन राक्षस निर्माण झाले. याचाच परिणाम विकासावर होत आहे़ आज देशात १ टक्के लोकांकडे ५८ टक्के संपत्ती आहे़ तर नऊ लोकांकडे असलेली संपत्ती देशातील ५० टक्के लोकांकडे असलेल्या संपत्तीपेक्षा जास्त आहे़ अशा घटकामुळे विषमता वाढत आहे़ ही वाढती विषमता ही मंदीचे कारण आहे असे मत साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीने किर्लोस्कर सभागृह येथे भारताची विकासनीती वास्तव व धोका या विषयावर लेखक अच्युत गोडबोले यांच्याशी संगणक अभ्यासक अतुल कहाते यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर श्रीकांत येळेगावकर उपस्थित होते.

गोडबोले पुढे म्हणाले, शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्यावर पुरेसा खर्च करण्याबरोेबर वीज, पाणी आदी सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवणे म्हणजे खरा सर्वांगीण विकास होय़ विकासामध्ये पर्यावरण हा खूप महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे़ विकासाकडे पाऊल ठेवताना आपण पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ जागतिकीकरणाचा फायदा खूप कमी लोकांना झाला आहे़ सरकारी आकडेवारीनुसार देशात ८.१ टक्के लोक बेरोजगार आहेत़ पण रोजगार संबंधी खूप कमी लोक नाव नोंदणी करत असतात़ देशात ९३ टक्के असुरक्षित  कामगार आहेत़ त्यांना उद्या आपण कुठे काम करणार आहेत याची माहितीही नसते. याचबरोबर आरोग्यासंबंधित जागृतीही नसणाºयांची संख्याही खूप कमी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षणावर कमी खर्च ...- शिक्षण, आरोग्य क्षेत्रात जीडीपीच्या तुलनेमध्ये कमी खर्च केल्यामुळे याचा फटका देशाला बसत आहे. यामुळेच देशातील ४१.५ टक्के लोक शाळेत कधी गेलेच नाहीत, ५८ टक्के महिला ३३ टक्के पुरुष कधीच शाळेला गेले नाहीत, शाळेचे शिक्षण पूर्ण केलेले १५.७ टक्के लोक आहेत. पदवीधर शिक्षण घेतलेले ४.५ टक्के लोक आहेत. द्विपदवीधर हे १.१ टक्के लोक आहेत तर २०१७ च्या आकडेवारीनुसार ७० टक्के शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत. ४० टक्के शाळांमध्ये मैदान नाही, अशी माहिती अच्युत गोडबोले यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरIndiaभारतAchyut Godboleअच्युत गोडबोले