मोडनिंबमध्ये विविध संघटनांच्या वतीने आंबेडकरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:55+5:302020-12-07T04:15:55+5:30
मोडनिंब : विविध संघटनांच्या वतीने मोडनिंब येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथे ...

मोडनिंबमध्ये विविध संघटनांच्या वतीने आंबेडकरांना अभिवादन
मोडनिंब : विविध संघटनांच्या वतीने मोडनिंब येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच दत्तात्रय सुर्वे, माजी सरपंच नागनाथ ओहोळ, सदाशिव पाटोळे, चांगदेव वरवडे, ग्रामपंचायत सदस्य नागेश माळी, बहुजन सत्यशोधक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील ओहोळ उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे वाचनालय येथेही माजी सरपंच बाबुरव सुर्वे, आनंद जाधव यांच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. आंबेडकर नगर येथील आंबेडकर भवनमध्ये नागनाथ ओहोळ, विश्वास ताकतोडे, सुनील ओहोळ, दत्ता ओहोळ, समाधान ओहोळ, स्वप्निल ओहोळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. शाहू, फुले, आंबेडकर बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमोद गाडे, बालाजी वाघमारे, संजू शिंदे, अमर ओहोळ, गौतम ओहोळ, पोलीस पाटील अण्णा ओहोळ, जीवन डावरे उपस्थित होते.
---