शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ग्रीन पीसच्या अहवालानुसार सोलापुरातील हवा प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 13:36 IST

२०१८ चा अहवाल प्रसिद्ध; देशात सोलापूरचा १९८ वा क्रमांक

ठळक मुद्देशहरातील हवा प्रदूषित झाली असल्याने श्वसनाच्या आजाराचा धोका वाढतोग्रीन पीसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार देशातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे ही प्रदूषित आहेत भारतात सर्वाधिक प्रदूषित असणाºया शहरांच्या यादीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झाला

सोलापूर : भारतात सर्वाधिक प्रदूषित असणाºया शहरांच्या यादीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झाला आहे. ग्रीन पीस इंडिया या पर्यावरणसंबंधी काम करणाºया संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. सोलापुरात हवेच्या दोन गुणवत्ता मापक केंद्रामधून घेतलेल्या चाचणीनुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

ग्रीन पीसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार देशातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे ही प्रदूषित आहेत. या प्रदूषित शहरांमध्ये २० शहरे ही महाराष्ट्रातील असून यात सोलापूर शहराचा देखील समावेश आहे. हवेतील अतिसूक्ष्म कणांची (पर्टीक्युलेट मॅटर १०) तपासणी करण्यात आली होती. यात सोलापूर शहराचा २०१८ मधील पीएम १० हा ७१ असा आहे. 

२०१७ मध्ये पीएम १० हा ६४ इतका होता. या एका वर्षामध्ये हवेमधील सूक्ष्मकणात ७ पीएम १० ने वाढ झाली आहे. शहरासाठी ठरविण्यात आलेल्या प्रमाणानुसार जर पीएम १० हा १०० च्या वर गेल्यास हवा अधिक धोकादायक बनू शकते. प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये सोलापूरचा क्रमांक हा देशात १९८ वा तर राज्यामध्ये १७ वा आहे.

श्वसनाच्या आजारांचा धोक ा- शहरातील हवा प्रदूषित झाली असल्याने श्वसनाच्या आजाराचा धोका वाढतो. सर्दी, शिंका, नाकातून पाणी येणे, दम्याचा त्रास वाढणे असे त्रास होतात. जुना दमा असेल तर तो पुन्हा डोके वर काढतो. डोळे जळजळ करतात. श्वसनाचे नवे रुग्ण असल्यास त्यांना लवकर दम लागतो, फुफ्फुसाचे आजार होण्याचा धोका. अंगावर पुरळ येणे, खाज सुटणे, त्वचा लाल होणे आदी त्रास होऊ शकतात असे कान-नाक व घसा तज्ज्ञ डॉ. रामेश्वर खटावकर यांनी सांगितले.

शहरातील वाहनांची संख्या वाढणे, रस्त्यांची परिस्थिती, शहरातील जागेवर इमारतींची संख्या वाढणे, झाडांची कमतरता, झाडे लावताना प्रदूषणासंबंधीचा विचार न करता लावणे आदी कारणामुळे प्रदूषण वाढीस लागते. शहरात वापरली जाणारी जुनी वाहने हे देखील प्रदूषणाचे कारण आहे. सध्या शहराच्या हवेतील पीएमचे प्रमाण हे ७१ असून १०० च्या दिशेने वाटचाल सुरु आहे. प्रदूषणाची हीच गती कायम राहिल्यास अतिधोकादायक वातावरण तयार होण्यास वेळ लागणार नाही.- डॉ. विनायक धुळप, पर्यावरण विभाग प्रमुख,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण