शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

स्मारकाच्या कट्ट्यावर आजोबा सांगू लागले शहीद नातवाची शौर्यगाथा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:03 IST

सुलतानपुरात उभारले शहीद राहुल शिंदेंचे स्मारक : २६/११ च्या आठवणी देतात प्रेरणा

ठळक मुद्दे२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर अतिरेक्यांनी सशस्त्र हल्ला केलामुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरले होते़कोणाचा पायपोस कोणाला नव्हता.. पोलीस सुरक्षा जवान आपलं कर्तव्य बजावत होते़

अय्युब शेख

माढा : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरले होते़.. कोणाचा पायपोस कोणाला नव्हता.. पोलीस सुरक्षा जवान आपलं कर्तव्य बजावत होते़..या हल्ल्यादरम्यान हॉटेल ताजमध्ये विशेष आॅपरेशन मोहीम राबविण्यात येत होती़..त्याच दरम्यान अतिरेक्यांशी मुकाबला सुरू असताना अचानक एक ग्रेनेड आला.. त्यात बटालियन १० मधील जवान राहुल सुभाष शिंदे हे शहीद झाले़.. आज जन्मगावी सुलतानपूर येथे अत्यंत देखणे स्मारक उभारले आहे़ त्यांच्या त्या स्मारकाच्या कट्ट्यावर बसून आजोबा विष्णू शिंदे हे नातू राहुल यांच्या शौर्याची गाथा युवापिढीपुढे मांडत असल्याचे दिसून आले.

शेती पिकत नसल्याने सुलतानपूरचा (ता़ माढा) सुभाष शिंदे या शेतकºयाचा मुलगा राहुल पोलीस भरतीचा निश्चय केला होता.  मित्रांबरोबर भरतीला गेल्यानंतर एस़ आऱ पी़ मध्ये पोलीस शिपाई म्हणून त्याची निवड झाली़ सोलापुरात प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर कर्तव्य बजावण्यासाठी त्याला मुंबईला पाठवण्यात आले होते़.

दरम्यान २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर अतिरेक्यांनी सशस्त्र हल्ला केला. संपूर्ण मुंबईला वेठीस ठेवण्याचा प्रयत्न अतिरेकी करत असताना भारतीय जवानांनी १० पैकी नऊ अतिरेक्यांना यमसदनी पाठविले़ हॉटेल ताजमध्ये अतिरेकी शिरल्याची खबर मिळाल्यानंतर मुंबईचे तत्कालीन उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक विशेष मोहिमेअंतर्गत दाखल झाले होते. नांगरे-पाटील जवानांना सूचना देत होते. ते अतिरेक्यांशी मुकाबला करीत  नागरिकांना, महिलांना व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवित असताना अतिरेक्यांकडून ग्रेनेडचा स्फोट झाला. त्यामध्ये जवान राहुल शिंदे हे शहीद झाले.

राहुल शिंदे यांचे आजोबा विष्णू सोपान शिंदे, आजी स्वरूप विष्णू शिंदे, वडील सुभाष विष्णू शिंदे, आई साखरबाई सुभाष शिंदे, लहान भाऊ प्रवीण, बहीण वर्षा असा मोठा परिवार आह़े  राहुल शिंदे याचे बलिदान हे देशवासीयांना प्रेरणादायी ठरले आहे.

सुलतानपूरचे ‘राहुल नगर’ नामकरण करा- २६ डिसेंबरच्या हल्ल्यात माझा मुलगा राहुल शिंदे हा शहीद झाला. आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजसुद्धा सुलतानपूर गावाला शहीद राहुल शिंदे हे नाव द्यावे यासाठी आम्ही शासकीय कार्यालयात पायपीट करीत आहोत. माढा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्रव्यवहार झाला आहे. या गावाला इतर कोणतीच पार्श्वभूमी नाही. नाव बदलल्यावर कोणताच समाज दुखावणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतीने चार वेळा दिला आहे़ प्रत्येक वर्षी कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाºया नेतेमंडळीकडून केवळ आश्वासनच मिळते आहे. अंमलबजावणी करुन गावाला राहुलनगर हे नाव द्यावे, अशी मागणी वीरपिता सुभाष शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाIndiaभारत