तडवळेत चार महिलांच्या हातात ग्रामपंचायतीच्या चाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:23 IST2021-01-23T04:23:08+5:302021-01-23T04:23:08+5:30
जय तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीकडून शोभा विश्वनाथ परबत, कमल गोसावी या नणंद-भावजय तर शोभा विश्वनाथ परबत व सारिका अकुंश परबत ...

तडवळेत चार महिलांच्या हातात ग्रामपंचायतीच्या चाव्या
जय तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीकडून शोभा विश्वनाथ परबत, कमल गोसावी या नणंद-भावजय तर शोभा विश्वनाथ परबत व सारिका अकुंश परबत या सासू-सुना विजयी झाल्याने आता ग्रामपंचायतची सत्ता महिलांच्या ताब्यात जाणार आहे. विरोधी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांच्या वनश्री ग्रामविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. विजयानंतर पेढे भरवून कार्यकर्त्यांनी गावात शांततेत विजयोत्सव साजरा केला.
जय तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीचे विजयी उमेदवार : शोभा परबत, शिवानी कल्याण गिरी, सारिका अकुंश परबत, कमल गोसावी तर वनश्री ग्रामविकास आघाडीकडून विजयी उमेदवार : महेंद्र शहाजी पाटील, अशोक प्रल्हाद वाघमारे, प्रभावती लोंढे.
फोटो ओळ- २२ कुर्डुवाडी-तडवळे
तडवळे(म) ता. माढा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यानंतर आ. संजयमामा शिंदे यांच्या गटाच्या विजयी महिला उमेदवार आनंद व्यक्त करताना.
----