शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक; प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आरोग्य कर्मचारी   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 17:29 IST

नियोजन करण्याच्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने  नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.  शंभरकर यांनी आज विधान परिषद निवडणूकमतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात ही बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, पोलीस उपायुक्त बापू बांगर उपस्थित होते.                                                                                                     

शंभरकर यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होईल याकडे लक्ष द्यावे.  नियुक्त समन्वय अधिकारी यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडत असतानाच इतर विभागाशीही समन्वय ठेवावा. त्याचबरोबर अहवाल वेळीच द्यावेत.                                                          

शंभरकर यांनी सांगितले की, मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा आहेत का याची पाहणी करावी.  मतदान केंद्रात स्वच्छता करुन घ्यावी. सैनिटायझर फवारणी करुन घ्यावी. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानेही पाहणी करावी. जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये असणाऱ्या केंद्रात संबंधित प्रशासनाने आवश्यक सुविधा असल्याची खात्री करावी.                                                                

निवडणूक प्रक्रियेत कामकाज करणाऱ्या आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांना प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षणादरम्यान शंका निरसन करावे, अशाही सूचना शंभरकर यांनी केल्या.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी  बैठकीच्या सुरवातीला निवडणूक आयोगाच्या सूचना आणि त्याअनुषंगाने केलेली तयारी याची माहिती दिली.  

या बैठकीस उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अनिल कारंडे, अरुणा गायकवाड, दीपक शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, वित्त आणि लेखा अधिकारी अजय पवार, तहसीलदार जयवंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकVotingमतदानSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय