शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या कृपेनं तलाव भरला श्री सिद्धरामेश्वरांचा; ‘लोकमत’ पुढाकारातून प्रकाशही पडणार हजारो दिव्यांचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 10:16 IST

यात्रा शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची; सोलापूरच्या ब्रँडिंगसाठी यंदा नवी मोहीम;  शेकडो सोलापूरकरांचा असणार सहभाग

ठळक मुद्देग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा यंदाही प्रकाशमय होणारगेल्या वर्षी नंदीध्वज मार्गांवर झळाळी दिसून आलीसोलापूरला पर्यटकांची संख्या वाढावी या उद्देशातून या दीपोत्सवाचे आयोजन

सोलापूर : गेल्या पाच वर्षांपासून ठणठणीत कोरडा पडलेला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा तलाव यंदा वरुणराजाच्या कृपेने काठोकाठ भरला असून, ‘लोकमत’च्या संकल्पनेतून अन् विविध जाती-धर्मातील सात संघटनांच्या पुढाकारातून ‘दीपोत्सव’ हे यंदाच्या यात्रेचे आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्यातील हजारो दिव्यांनी मंदिर अन् तलाव परिसर उजळून निघणार आहे. गतवर्षीच्या प्रकाशमय यात्रेची प्रचिती यंदाही भाविकांना येणार असून, ‘दीपोत्सव’ सोहळ्यात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा रंगणार अन् सजणार आहे.

३०-३५ वर्षांपूर्वी जशी यात्रा साजरी व्हायची तशी यात्रा साजरी व्हावी, या भाविकांच्या भावनेचा विचार करुन ‘लोकमत’ने गेल्यावर्षी त्यावर प्रकाश टाकला होता. ‘प्रकाशमय यात्रा-सिद्धरामेश्वरांची यात्रा’ ही संकल्पना ‘लोकमत’ने मांडली. वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले आणि त्यांच्या टीमने या संकल्पनेसाठी पुढाकार घेतला. भक्तगणांनी घरांवर, दुकानांवर विद्युतरोषणाई तर नंदीध्वज मार्गावर विद्युत माळा सोडण्याबाबत सर्वच जाती-धर्मांमधील लोकांना आवाहन केले. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून यंदा ‘लोकमत’च्या पुढाकारातून दीपोत्सव या सोहळ्याची संकल्पना शेकडो सोलापूरकरांकडून पुढे आली आहे. दीपोत्सवाच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरासह सोलापूरचे ब्रँडिंग करण्याचा उद्देशही ‘लोकमत’सह सात संघटनांनी ठेवला आहे. 

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला. तोच संदेश ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमातून दिसून येतो. यात्रेतील चार प्रमुख सोहळ्यांवेळी निघणाºया मिरवणुकीतील मानाचे सात नंदीध्वज हे वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे त्यातून समतेची प्रचिती येते. हाच धागा पकडून अक्षता सोहळ्याच्या आधी तीन दिवस मंदिर परिसरात जिथे योग्य ठिकाणी जागा मिळेल, त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्याचा विचार ‘लोकमत’ने मांडला. या संकल्पनेत सहभागी होण्याचा निर्णय लिंगायत, मराठा, धनगर, ब्राह्मण, मागासवर्गीय, पद्मशाली अन् मुस्लीम समाजातील प्रत्येक एकेक संघटनांनी घेतला   आहे. 

दीपोत्सवात या संघटनांचा असणार सहभाग

- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा यंदाही प्रकाशमय होणार आहे. गेल्या वर्षी नंदीध्वज मार्गांवर झळाळी दिसून आली. यंदा या उपक्रमाचा विस्तारही वाढविण्यात येणार असून, संपूर्ण शहर लख-लख प्रकाशात उजळून निघावे, यासह दीपोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हिजनसह सकल मराठा समाज, मार्कंडेय जनजागृती संघ, हिंदू धनगर सेना,माहेश्वरी प्रगती मंडळ, विजापूर वेस युवक संघटना, समस्त ब्राह्मण समाज संघटनेने पुढाकार घेतला आहे.

  • पर्यटन वाढीचाही उद्देश
  • - महाराष्ट्रासह परप्रांतातील अनेक जण कामानिमित्त सोलापूरला येतात. काही भाविक देवदर्शनासाठी पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूरच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र सोलापुरात येऊन त्यांना ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिराबाबत कसलीच कल्पना नसते.
  • - ‘ए टेम्पल इन वॉटर’ अशी ख्याती असताना मंदिराचे ब्रँडिंग कुठे होताना दिसत नाही. मंदिराचे जेणेकरुन सोलापूरचे ब्रँडिंग व्हावे आणि सोलापूरला पर्यटकांची संख्या वाढावी या उद्देशातून या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तमाम सोलापुरातील भक्तगणांसह विविध सेवाभावी संस्था उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा