शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गाजरं फुकट... सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थसंकल्पाचा असाही निषेध

By appasaheb.patil | Updated: March 10, 2023 13:24 IST

यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या घोषणेने परिसरातील लाेकांचे लक्ष वेधून घेतले होते

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : महाराष्ट्रातील भाजप व शिंदे गटाच्या सरकारने गुरूवारी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ गाजरे दाखविणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. अर्थसंकल्पाचा निषेध करीत सोलापुरात ठाकरे गटाच्या नेत्यांनी शुक्रवारी सकाळी अनोखे आंदोलन करीत लोकांना फुकट गाजरांचे वाटप केले.

यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या घोषणेने परिसरातील लाेकांचे लक्ष वेधून घेतले होते. हलग्याही वाजविण्यात आल्या.  यावेळी ठाकरे गटाचे पुरूषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, लहू गायकवाड, विठ्ठल वानकर, विष्णु कारमपुरी, अजय दासरी, संतोष केंगनाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीस व शिंदे गटाने मांडलेला अर्थसंकल्प शब्दाची इमली करून मोठा दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता या अर्थसंकल्पातून कामगार, शेतकरी, दलितांना, हाताला काम नाही, महागाई वाढलेली आहे, डिझेल, पेट्रोल वाढले, शेतीमालाला भाव नाही, जातीमध्ये विषमता दाखविणारा अर्थसंकल्प आहे. लोकांना स्वप्नांचे गाजर दाखविणारा हा अर्थसंकल्प असल्याची टिका पुरूषोत्तम बरडे यांनी केली आहे. कांदा, कापूस, सोयाबीन, भाजीपाला आदी सर्व शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्यात एकीकडे शेतकरी शेतमालाची होळी करत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ठोस अशी घोषणा करण्याची गरज असताना कुठलीही घोषणा करण्यात आलेली नसल्याचे विष्णु कारमपुरी यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाagitationआंदोलनBudgetअर्थसंकल्प 2023Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023