शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

बंजारा समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; सोलापूर जिल्ह्यातील बांधवांनी जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 5:24 PM

सोलापूर : जिल्ह्यात सेवालाल महाराजांचे स्मारक, नॉन क्रिमिलेअरच्या अटीतून बंजारा समाजाची सुटका, वसंतराव नाईक महामंडळ, जिल्ह्यात बंजारा भवनाची उभारणी ...

ठळक मुद्देबंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावाची अट न घालता स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यारमाई आवास योजनेच्या धर्तीवर समाजाला घरकुलाचे लाभ द्यावसंतराव नाईक महामंडळासाठी निधीची वाढीव तरतूद करा

सोलापूर : जिल्ह्यात सेवालाल महाराजांचे स्मारक, नॉन क्रिमिलेअरच्या अटीतून बंजारा समाजाची सुटका, वसंतराव नाईक महामंडळ, जिल्ह्यात बंजारा भवनाची उभारणी आदी मागण्यांसाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. 

 मुळेगाव तांडा ग्रामपंचायतीचे सरपंच विजयकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र् भोसले यांची भेट घेतली. केंद्र आणि राज्यातील सरकार बंजारा समाजाच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. समाजाकडे  बघण्याची सरकारची आकस बुद्धी आहे. याकडे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. राज्यात २२ टक्के भटके विमुक्त असताना या समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय नाही. वारंवार विनंती करूनही बंजारा समाजाच्या  तांड्यांना  स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा दिला जात नाही. त्यामुळे समाजाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, अशी तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे. 

बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावाची अट न घालता स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, रमाई आवास योजनेच्या धर्तीवर समाजाला घरकुलाचे लाभ द्या,  वसंतराव नाईक महामंडळासाठी निधीची वाढीव तरतूद करा, समाजाच्या पारंपरिक व्यवसायातील अडचणी दूर करा,  समाजासाठी बंजारा भवनाची उभारणी करा, तांडा तेथे शाळा, व्यायामशाळा, अंगणवाड्या, आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. या मंडळात मनोहर राठोड,  तेजस्विनी महिला बचत गटाच्या अश्विनी रवींद्र राठोड,नागनाथ जाधव, प्रकाश चव्हाण, अंकुश राठोड, रमेश चव्हाण, जैनुद्दीन पटेल, सुभाष राठोड, प्रकाश राठोड, श्रीकांत राठोड, डॉ़ ए़ एम़ शेख, किसन राठोड, धनू राठोड, बाळू पवार, राजकुमार राठोड, दशरथ पवार, धर्मराज चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, रेखू राठोड, रतन पवार, फुलसिंग चव्हाण, अश्विनी चव्हाण आदींचा समावेश होता.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय