शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास भारत सरकारचा स्टार स्टेट्स सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:05 IST

महाविद्यालयास २०१७ -१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीसाठी महाविद्यालयातील विज्ञान व तंत्रज्ञान विषयक बाबींच्या सशक्तीकरणासाठी ६९ लाख रुपयांचे ...

महाविद्यालयास २०१७ -१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीसाठी महाविद्यालयातील विज्ञान व तंत्रज्ञान विषयक बाबींच्या सशक्तीकरणासाठी ६९ लाख रुपयांचे अनुदान जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून प्राप्त झाले होते. या अनुदानाच्या माध्यमातून महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत झालेली गुणवत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबींचे मूल्यांकन जैवतंत्रज्ञान विभागाच्या समितीकडून केले.

त्यास अनुसरून या समितीने महाविद्यालयाची निवड ‘स्टार स्टेट्स’ पुरस्काराच्या सादरीकरणासाठी केली. त्यानुसार महाविद्यालयाचे सादरीकरण ऑनलाइन पद्धतीने जैवतंत्रज्ञान विभागाच्या कार्यबल गटासमोर २५ ऑगस्ट २०२० रोजी केले होते. सादरीकरणानंतर कार्यबल गटाने केलेल्या शिफारशीनुसार श्री शिवाजी महाविद्यालयास ९ डिसेंबर रोजी ‘स्टार स्टेट्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालयास या उपक्रमांतर्गत पुढील तीन वर्षांसाठी एक कोटी ८९ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानाच्या माध्यमातून महाविद्यालयातील रसायनशास्र, सूक्ष्मजीवशास्र, भौतिकशास्र, विजाणूशास्र, प्राणिशास्र आणि वनस्पतीशास्र या विभागांना आधुनिक प्रयोगशाळा साहित्य प्राप्त होणार आहे.

तसेच या अनुदानातून महाविद्यालयामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी शिबिरे, कार्यशाळा आणि विविध वैज्ञानिक उपक्रम राबविले जाणार आहेत. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, सचिव व्ही. एस. पाटील, सह सचिव पी. टी. पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर यांनी प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, स्टार कॉलेज उपक्रमाचे समन्वयक डॉ. व्ही. एम. गुरमे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे काैतुक केले.

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय