शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बस लागली अन खिडकीतून पिशवी टाकली, बार्शी स्थानकावर सहा हजारांची पर्स पळवली

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 8, 2024 21:08 IST

संशय आल्याने त्यांनी उघडून पाहिली असता त्यातील पैसे चोरट्यांनी लांबवल्याचे निदर्शनास आले.

सोलापूर  : स्थानकावर बस लागताच माहेरी निघालेल्या विवाहितेने बसायला जागा मिळवण्यासाठी खिडकीतून सीटवर पिशवी टाकली. पित्यासोबत आत चढून येईपर्यंत चोरट्यांनी पिशवीतील पर्स उघडून त्यातील सहा हजारांची रोकड पळवल्याची घटना बार्शी बस स्थानकावर घडली.ही घटना गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. याबाबत पूजा अमोल पाटील (वय २६, रा. उंडेगाव, ता. बार्शी) या विवाहितेने बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, फिर्यादी पूजा या लातूरला माहेरी निघालेल्या होत्या. त्या पतीसोबत दुचाकीवर बसून बार्शी बस स्थानकावर आल्या. पुढे माहेरी नेण्यासाठी वडीलही स्थानकावर थांबले होते. इतक्यात तुळजापूर आगाराची बस आली आणि आत चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. बसायला जागा मिळावी म्हणून पर्समध्ये पैसे असलेली पिशवी खिडकीतून सीटवर टाकली. बसमध्ये चढून सीटवर बसलेल्या विवाहितेने पिशवीतील पर्सची चेन उघडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी उघडून पाहिली असता त्यातील पैसे चोरट्यांनी लांबवल्याचे निदर्शनास आले. दरम्यान त्यांनी खाली उतरून शोध घेतला असता पैसे हाती लागले नाही. अखेर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी