गोरड, सुरवसे, राणे, गाडे यांनी पटकावले विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:08+5:302021-02-05T06:46:08+5:30

येथील शिवरत्न कुस्ती अकॅडमी येथे स.म. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०३ व्या जयंतीचे औचित्य साधून ताराराणी कुस्ती केंद्र, शिवरत्न कुस्ती ...

Gorad, Survase, Rane, Gade won the title | गोरड, सुरवसे, राणे, गाडे यांनी पटकावले विजेतेपद

गोरड, सुरवसे, राणे, गाडे यांनी पटकावले विजेतेपद

येथील शिवरत्न कुस्ती अकॅडमी येथे स.म. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०३ व्या जयंतीचे औचित्य साधून ताराराणी कुस्ती केंद्र, शिवरत्न कुस्ती अकॅडमी व धैर्यशील मोहिते-पाटील मित्रमंडळ यांच्यातर्फे १४, १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. उद्‌घाटन शिवरत्न अकॅडमीचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील व ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव शिवदास शिंदे, तेजपाल वाघ, प्रा. डाॅ. विश्वनाथ आवाड, अनिल जाधव, नितीन बनकर, श्रीकांत राऊत, धर्मराज दगडे, तानाजी काशिद, राहुल जगताप, महादेव ठवरे, आप्पा वाघमोडे उपस्थित होते. या स्पर्धेतील ४२, ५५, ५८ व ६८ किलो वजनाच्या ४ गटात १८६ मल्ल सहभागी झाले होते. स्पर्धेत एकूण १४१ कुस्त्या लावण्यात आल्या.

मोठ्या कुस्ती स्पर्धेत उतरण्यापूर्वी मॅटवरील कुस्तीचा सराव व्हावा, स्पर्धेचे नियम व गुण पध्दती माहिती व्हावी या हेतूने कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून खेळाडूचा आत्मविश्वास वाढीला लागण्यास मदत होईल. १ ते ५ मे २०२१ दरम्यान आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांसाठी दीड लाख व मुलींसाठी एक लाख रुपये बक्षिसाची मॅटवरील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी खेळाडूंनी कसून सराव करावा, असे शिवरत्न अकॅडमीचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.

उद‌्घाटनाची कुस्ती १४ वर्षांखालील गटात सौरभ जाधव विरुध्द ओम बुधावले यांच्यातील कुस्ती धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. या लढतीत ओम बुधावले याने सौरभ जाधवला २ गुणांनी पराजीत केले. १४ वर्षांखालील गटात ४२ किलो वजन, १७ वर्षांखालील गटात ५५ किलो वजन व १९ वर्षांखालील गटात ५८ व ६८ किलो वजनाच्या कुस्ती लावण्यात आल्या.

१४ वर्षांखालील ४२ किलो वजनगटात सोमनाथ मच्छिंद्र गोरड (माळशिरस, विजेता), शुभम विजय सोनवणे (कुर्डूवाडी, उपविजेता), १७ वर्षांखालील ५५ किलो वजनगटात विशाल राजाराम सुरवसे (खुडुस, विजेता), विशाल शिवाजी रुपनवर (म्हसवड, उपविजेता), १९ वर्षांखालील ५८ किलो वजनगटात किरण विष्णू राणे (फलटण, विजेता), ॠषीकेश रामचंद्र देवकर (पंढरपूर, उपविजेता), तर ६८ किलो वजनगटात गणेश कैलास गाडे (खुडूस, विजेता), कुमार बाळकृष्ण नाईकनवरे (पंढरपूर, उपविजेता) यांनी यश मिळवले.

स्पर्धेसाठी पंचाचे काम अंकुश अरकिले, जयसिंग बंडगर, सुहास तरंगे, भोलानाथ पाल, युवराज मोटे यांनी पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल जगताप, सुहास तरंगे, हरी ढेंबरे, काकासाहेब जगदाळे, भैय्या कोडग, दीपाली सातपुते, शिवाजी गोडसे, बाळासाहेब रणनवरे, समाधान वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

फोटो लाईन :::::::::::::::

अकलूज येथे आयोजित मुलांच्या मॅटवरील उद‌्घाटनाची कुस्ती लावताना धैर्यशील मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील व अन्य.

Web Title: Gorad, Survase, Rane, Gade won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.