भगवंत सहकारी पुरवठा मंडळी संस्थेस मृणाल देव यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:22 IST2020-12-31T04:22:50+5:302020-12-31T04:22:50+5:30

यावेळी नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, अध्यक्ष आनंद कुलकर्णी अंबेजवळगेकर, उपाध्यक्ष उमेश ठोंबरे, संचालक रामचंद्र गौरकर, शब्बीर तांबोळी, नंदकुमार ...

Goodwill visit of Mrinal Deo to Bhagwant Sahakari Supply Mandali Sanstha | भगवंत सहकारी पुरवठा मंडळी संस्थेस मृणाल देव यांची सदिच्छा भेट

भगवंत सहकारी पुरवठा मंडळी संस्थेस मृणाल देव यांची सदिच्छा भेट

यावेळी नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, अध्यक्ष आनंद कुलकर्णी अंबेजवळगेकर, उपाध्यक्ष उमेश ठोंबरे, संचालक रामचंद्र गौरकर, शब्बीर तांबोळी, नंदकुमार देशमुख, भालचंद्र नाईकवाडी, अरुण देशमुख, माधुरी गोलकोंडा, व्यवस्थापक रवींद्र माचवे आदी उपस्थित होते.

अभिनेत्री देव यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेमध्ये आपल्या सासरच्या मंडळींचा मोठा सहभाग असल्याचा उल्लेख करीत असेच सचोटीने कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार राऊत यांनी भगवंत सहकारी पुरवठा मंडळी संस्थेचा बार्शी तालुक्याच्या विकासात त्यांचा वाटा असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी छोटूभाऊ लोहे, बबन चकोर, रा. स्व. संघाचे तालुका कार्यवाह मोहन श्रीरामे, अनिल खजानदार, सूर्यकांत देशमुख, संस्थेचे सभासद, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र गौरकर यांनी, तर सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक रवींद्र माचवे यांनी मानले.

----३०बार्शी-भगवंत

Web Title: Goodwill visit of Mrinal Deo to Bhagwant Sahakari Supply Mandali Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.