लॉकडाऊनचा सदुपयोग.. कृषी कन्येकडून बळीराजाला मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:15+5:302020-12-05T04:46:15+5:30
राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थिनी स्मिता शेळके हिने बार्शी ...

लॉकडाऊनचा सदुपयोग.. कृषी कन्येकडून बळीराजाला मार्गदर्शन
राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थिनी स्मिता शेळके हिने बार्शी तालुक्यातील शेलगाव (मा) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये तिने मृदा परिक्षणासाठी मातीचे नामुने कशा पद्धतीने घ्यावे, याचे प्रात्यक्षिक दाखवत मृदा परिक्षणाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. यासाठी कृषी महाविद्यालय पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. डी. मासाळकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. डी. तरडे, चेअरमन डॉ. एन. एन. वाघमारे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. एस. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
------