शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Good News; सोलापूर महानगरपालिकेचा सुपर टॅक्स होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 17:02 IST

सोलापूर : शहरातील व्यापार सुसह्य व्हावा, शहरात मल्टिनॅशनल कंपन्यांचे शोरूम्स, मॉल यावेत यासाठी महापालिकेचा सुपर टॅक्स जवळजवळ रद्द करण्याचा ...

ठळक मुद्देमहत्त्वपूर्ण निर्णय : बँका, मल्टिनॅशनल कंपन्यांना होणार फायदा सुपर टॅक्स रद्द करण्याबाबतच्या प्रस्तावाची १ एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी ५११ जण सुपर टॅक्स भरत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे

सोलापूर : शहरातील व्यापार सुसह्य व्हावा, शहरात मल्टिनॅशनल कंपन्यांचे शोरूम्स, मॉल यावेत यासाठी महापालिकेचा सुपर टॅक्स जवळजवळ रद्द करण्याचा प्रस्ताव मनपाच्या कर संकलन विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मनपा आयुक्त दीपक तावरे यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मंजुरीसाठी तो सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

सोलापूर महापालिकेचा सुपर टॅक्स पुण्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथे मल्टिनॅशनल कंपन्या येत नाहीत, असा निष्कर्ष सर्वपक्षीय नेत्यांनी काढला आहे. या कराची पुनर्रचना व्हावी, अशी मागणी महापालिकेच्या पदाधिकाºयांनी केली होती. त्यावर चर्चा करण्यासाठी २९ आॅक्टोबर रोजी महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी सुपर टॅक्स कमी करण्याचे आश्वासन दिले होते. 

त्यानंतर कर संकलन विभागाने सुपर टॅक्स कमी करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर महापालिकांच्या कर आकारणीचा अभ्यास केला. यातील निष्कर्षानुसार सुपर टॅक्स जवळपास रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. शिवाय आता मिळकतदार व भाडेकरू यांच्यातील झालेल्या भाडेपट्टा करारानुसार महापलिकेचा कर मिळकतदार किंवा भाडेकरू यापैकी कोणीही भरणार असतील तर त्यांच्या बाबतीत भाडे किंवा करपात्र मूल्य एकच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल, असा निष्कर्ष कर संकलन प्रमुखांनी काढला आहे. 

काय आहे सुपर टॅक्स - शहरातील अनेक मालमत्ताधारकांनी मल्टिनॅशनल कंपन्यांना आपल्या जागा भाड्याने दिल्या आहेत. या भाड्यावर महापालिकेकडून सुपर टॅक्स आकारला जातो. अनेक भागात भाडे आकारणीवर सुमारे ६४ टक्क्यांपर्यंत सुपर टॅक्स आकारला जातो. यातून पळवाट काढण्यासाठी अनेक व्यापारी मूळ भाडेकरारासह कमी भाडे आकारणीचा दुसरा करार करून घेतात. शहरात जवळपास असे १९ हजार भाडेकरार निदर्शनास आले आहेत़ यातील केवळ ५११ जण सुपर टॅक्स भरत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. 

आचारसंहितेत अडकणार - सुपर टॅक्स रद्द करण्याबाबतच्या प्रस्तावाची १ एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी व्हावी, असे कर संकलन विभागाने म्हटले आहे. हा प्रस्ताव पुढील आठवड्यात प्रशासनाकडून मंजूर होईल, पण त्यानंतर तो तत्काळ सर्वसाधारण सभेत येईल की नाही, याबद्दल शंका आहे. पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTaxकरbusinessव्यवसाय