शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

Good News; सोलापूर जिल्ह्यातील एप्रिल, मे च्या अवकाळीग्रस्तांना मिळेल दिवाळीपूर्वी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 4:07 PM

नुकसानग्रस्त मदत दिवाळीपूर्वी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार

सोलापूर : चालू वर्षाच्या एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतीपिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ५७ लाख १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त मदत दिवाळीपूर्वी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अवकाळी पावसाने बागायती ४०.३० हेक्टरचे, तर २८६.९० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. ही मदत संबंधित तहसीलदारांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात ०.७० हेक्टर नुकसान झाले असून त्यांच्यासाठी १२ हजार ६०० रुपये, बार्शी तालुक्यात ५ हेक्टरचे नुकसान झाले असून ९१ हजार ९८०, दक्षिण सोलापूर तालुक्यात ८१.८० हेक्टरसाठी १३.८३ लाख, अक्कलकोट तालुक्यात ६.४० हेक्टरसाठी १ लाख १५ हजार, माढा तालुक्यात ४८.४५ हेक्टरचे नुकसान झाले असून ८ लाख ७२ हजार, करमाळा तालुक्यात १०.४० हेक्टरसाठी १ लाख ७५ हजार, पंढरपूर तालुक्यात १७१ हेक्टरसाठी ३० लाख १८ हजार, तर सांगोला तालुक्यात २.८० हेक्टरवरील नुकसानीसाठी ३९ हजार ६०० रुपये तहसीलदारांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार असल्याने अडचणीतील शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊसagricultureशेती