शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Good News; दशकात प्रथमच जुलैमध्ये यंदा सोलापुरात पावसाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 14:45 IST

सोलापूर जिल्हा : अक्कलकोट तालुक्याची आघाडी; ४८ मिलिमीटर नोंद

ठळक मुद्देसरासरी १९७.३ मिलिमीटर असताना २०१३ मध्ये २३५ मिलिमीटर तर २०१६ मध्ये १९८ मिलिमीटर पाऊस पडला या महिन्याच्या शिल्लक असलेल्या सहा दिवसांत पडणाºया पावसामुळे या आकडेवारीत आणखी भरच पडणार जिल्ह्यात एकूण १४.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला. एकट्या अक्कलकोट तालुक्यात ४८ मिलिमीटर पाऊस पडला

सोलापूर : जून-जुलै या दोन महिन्यांमध्ये दशकात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत तब्बल २८४.९ मिलिमीटर पाऊस पडला  आहे. २०१० मध्ये यापेक्षा अधिक म्हणजे ३३० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर या वर्षीच सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 

यावर्षी रोहिणी नक्षत्रात पावसाला सुरुवात झाली. जून महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू झालेला पाऊस जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात दररोज पडत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कोकणासारखे चित्र निर्माण  झाले आहे. जिल्ह्यात जून महिन्यात १०२.५ व जुलै महिन्यात ९४.८ असा दोन महिन्यांत एकूण १९७.३  मिलिमीटर सरासरी पाऊस पडणे अपेक्षित आहे. जून व जुलै या दोन महिन्यांत २०१० नंतर यावर्षी सरासरीपेक्षा दीडपटीहून अधिक पाऊस पडला आहे. 

सरासरी १९७.३ मिलिमीटर असताना २०१३ मध्ये २३५ मिलिमीटर तर २०१६ मध्ये १९८ मिलिमीटर पाऊस पडला होता. यावर्षी २५ जुलैपर्यंत २८४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. म्हणजे या दशकात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या महिन्याच्या शिल्लक असलेल्या सहा दिवसांत पडणाºया पावसामुळे या आकडेवारीत आणखी भरच पडणार आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात एकूण १४.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला. एकट्या अक्कलकोट तालुक्यात ४८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. असे असले तरी याच तालुक्यातील किणी मंडलात पावसाची शून्य इतकी नोंद आहे. शुक्रवारी किणी, शेळगी, तिºहे, उमरड, केत्तुर, वळसंग, आगळगाव, पांगरी, पानगाव, रोपळे व दहिगाव या मंडलात पाऊस पडला नसल्याचे दिसते.

तालुकानिहाय  पाऊस व टक्केवारी

  • उत्तर सोलापूर - २३८ मि.मी.(११०.२)
  • द. सोलापूर - २२७ मि.मी. (१२३.४)
  • बार्शी - ३१७ मि.मी. (१५२.८)
  • अक्कलकोट - २९४ मि.मी.(४१.४) 
  • मोहोळ - २९२ मि.मी. (१८४.६)
  • माढा - ३०८ मि.मी.(१८०.३) 
  • करमाळा - २४३ मि.मी. (१४२.७)
  • पंढरपूर - २६३ मि.मी.(१५१.६) 
  • सांगोला - २९८ मि.मी.(१८५.४)
  • माळशिरस - २९८ मि.मी. (१६८) 
  • मंगळवेढा - ३२५ मि.मी.(२१९.८)

६  एकूण २८५ मि.मी. (१५९.२ टक्के). २५ जुलैपर्यंत १७९ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना २८४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. 

या मंडलात सर्वाधिक पाऊस 

  • शुक्रवारी २४ जुलै रोजी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर मंडलात सर्वाधिक १०१ मिलिमीटर पाऊस पडला. याच तालुक्यातील चपळगाव मंडलात ६४ तर तडवळ मंडलात  २८ मिलिमीटर पाऊस पडला.  
  • उत्तर तालुक्यातील मार्डी मंडलात १४ मिलिमीटर, दक्षिण सोलापूर तालुक्यात मुस्ती मंडलात २०  मिलिमीटर, मोहोळ तालुक्यातील कामती मंडलात २२ मिलिमीटर, माढा तालुक्यातील कुर्डूवाडी मंडलात ३९ मिलिमीटर, करमाळा तालुक्यातील केम मंडलात ५९ मिलिमीटर. 
  • पंढरपूर तालुक्यातील भाळवणी मंडलात ३० मिलिमीटर, सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडलात ३२ मिलिमीटर, माळशिरस तालुक्यातील नातेपुते मंडलात ४३ मिलिमीटर तर मंगळवेढा तालुक्यातील मारापूर मंडलात ३१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय