शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Good News; शेतकºयांनो...पीक कर्ज हवं असेल तर ही बातमी नक्की वाचा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:54 IST

जिल्हा प्रशासनाची नवी आयडिया; कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घेतला निर्णय

ठळक मुद्दे या लिंकव्दारे नोंदणी केलेल्या शेतकºयांची यादी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेकडे पाठविण्यात येणारएका आधारकार्ड धारकास एका बँकेतच पीक कर्ज मागणी करता येणार आहेआपले गाव ज्या बँकेला दत्तक आहे,  त्या बँकेचे नाव आॅनलाईन अर्ज भरताना टाकणे आवश्यक

सोलापूर  : कोरोनो विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातील  पीक कर्जासाठी इच्छुक शेतकºयांनी प्रत्यक्ष बँकेत येणे टाळून  https://solapur.gov.in संकेतस्थळावरील आॅनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

 या लिंकव्दारे नोंदणी केलेल्या शेतकºयांची यादी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेकडे पाठविण्यात येणार आहे . एका आधारकार्ड धारकास एका बँकेतच पीक कर्ज मागणी करता येणार आहे. त्यामुळे आपले गाव ज्या बँकेला दत्तक आहे,  त्या बँकेचे नाव आॅनलाईन अर्ज भरताना टाकणे आवश्यक आहे, असेही शंभरकर यांनी सांगितले.

याबाबत अग्रणी बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी सांगितले की, सदर अर्ज परिपूर्ण माहितीनिशी भरावा. त्यानंतर तो अर्ज जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेच्या जिल्हा समन्वयक यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा समन्वयक ती माहिती संबंधित शाखेकडे पाठवतील. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक  शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाºया शेतकºयांना कळवण्यात येईल. अर्जदार शेतकºयाने अर्ज केल्यापासून तीन दिवसानंतर संबंधित  शाखेत पुढील कागदपत्रासह संपर्क साधावा. आधारकार्ड, सातबारा,  ८ अ , फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचन नकाशा, पासपोर्ट साईज २ फोटो, पास बुक.

अंतिम पीक कर्ज मंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल़ सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी व शाखाधिकारी यांनी नोंदणी केलेल्या शेतकºयांची यादी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्या कडून प्राप्त करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे कडू यांनी सांगितले.-------------पीक कर्जाचे उद्दष्ट्यि पूर्ण करण्यास बँक आफ इंडियाचा पुढाकारसोलापूर जिल्ह्यासाठी बँक आॅफ इंडिया अग्रणी बँक आहे.  बँकेच्या जिल्ह्यात ५६ शाखा आहेत. या पोर्टलव्दारे प्राप्त झालेल्या  ३५३४ अर्जापैकी २३०३ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.  उर्वरित अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकरी खातेदारांना नवीन कर्ज देण्यासाठी सर्व शाखांना सूचना देण्यात  आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पीक कर्जाबरोबरच खेळते भांडवल, शेती विकास कर्ज, पशु संवर्धन आदीसाठी लागणारे कर्जही दिले जाईल, असे कडू यांनी सांगितले. पीक कर्जाचे उद्दष्ट्यि पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.--------------अर्ज करण्यासाठीच्या वेबसाईट, लिंक शेतकºयांनी पीक कर्ज मागणी अर्ज भरण्यासाठी https://solapur.gov.in  दस्त ऐवज  आॅनलाइन अर्ज भरा - पीक कर्ज मागणी अर्ज २०२०-२०२१ वर क्लिक करावे, अथवा https://solapur.gov.in  कोरोना - पीक कर्ज मागणी अर्ज 2020-2021  लिंकवरील फॉर्म भरून पीक कर्ज मागणी नोंदणी करावी. नोंदणीमध्ये काही अडचण आल्यास दत्तक बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कडू यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रagricultureशेतीFarmerशेतकरी