शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Good News; सांगोला साखर कारखान्याचा येत्या हंगामापासून गळीत हंगाम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 20:58 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला : मागील अनेक वर्षापासून बंद असलेल्या सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचा अखेर अनेक वर्षाचा वनवास संपला. येत्या गळीत हंगामापासून साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात होणार आहे.  त्यामुळे सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे . 

राज्य शिखर बँकेने सांगोला सा.का. लाँगलीग भाडेतत्त्वावर धाराशिव सह. साखर कारखाना प्रा.लि. चेअरमन अभिजीत पाटील यांना चालविण्यास दिला आहे. दरम्यान धाराशिव साखर कारखाना कंपनीकडून आज रविवारी सांगोला साखर कारखान्या तील स्वच्छता साफसफाईसह मशीनरीची दुरुस्ती कामे करण्यास सुरुवात केली आहे. 

महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून ५  ऑगस्ट रोजी सांगोला सहकारी साखर कारखाना लाँगलीग भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या.दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य शिखर बँकेचे चेअरमन अनासकर,  एम.डी. देशमुख, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, सांगोला साखर कारखाना चेअरमन दीपक साळुंखे-पाटील यांची मुंबईत संयुक्त मिटिंग होऊन सांगोला कारखाना लॉंगलीग भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास अधिकृत शिक्कामोर्तब  झाले.

सांगोला साखर कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेजारील तालुक्यातील कारखान्याकडे ऊस गाळपाला घेऊन जाण्यासाठी हातापाया पडावे लागत होते. आता आपल्या तालुक्यातील कारखाना सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण दूर होणार आहे, शिवाय तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणार आहे. पंढरपूर येथील डीवीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील हा कारखाना चांगल्या प्रकारे चालवून कर्जातून बाहेर काढण्याबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देऊन न्याय देतील असा विश्वास सांगोला कारखान्याचे चेअरमन माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दिला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाSugar factoryसाखर कारखानेPandharpurपंढरपूर