शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Good News; कोरोनाच्या जागृतीमुळे डेंग्यू हद्दपार; वर्षभरात एकाचाही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 13:01 IST

मागील दोन वर्षांत डेंग्यूचे प्रमाण झाले कमी- कोरोनामुळे जागृतीत वाढ

सोलापूर-ः जिल्ह्यात मागील दोन वर्षांत डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२० मध्ये १३२ जणांना डेंग्यू झाला होता. चांगली बाब म्हणजे, २०२० मध्ये डेंग्यूने एकाचाही मृत्यू झाला नाही.

कोरोनामुळे इतर विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बराच काळ उपचारापासून वंचित रहावे लागले आहे. मात्र, डेंग्यू, मलेरिया या डासांचा नाश करण्यासाठी आरोग्य विभाग व महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने स्वच्छतेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. कोरोनासह साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठीही पालिकेचे दवाखाने, आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांत उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत.

डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजार होऊ नये म्हणून आरोग्य विभाग काम करत आहे. २०१९ मध्ये ७६८ संशयित नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यातून ७५ जणांना डेंग्यूचे निदान झाले, तर एकाचा मृत्यू झाला.

महापालिकेतर्फे जुलै महिन्यापासून कंटेनर सर्व्हेक्षण सुरू आहे. यात महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी केली. वापरण्याच्या पाण्यात लारवा (अळी) आढळल्यास त्यात रसायन टाकण्यात आले. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मागील वर्षी ज्या परिसरात रुग्ण आढळला त्या परिसराची पाहणी करण्यात आली.

------

कुठल्यावर्षी किती रुग्ण

  • २०१६ - ५७९
  • २०१७ - ५५२
  • २०१८ - ५६८
  • २०१९ - ७५
  • २०२० - १३२

डेंग्यूची लक्षणे

  • - डेंग्‍यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात.
  • - अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी ही मुख्य लक्षणे
  • - डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी
  • - रक्‍तस्‍त्रावित डेंग्‍यू तापाचे निदान हे हात-पाय, चेहरा व मान यावर आलेल्‍या पुरळांवरून केले जाते.
  • - नाकातून, हिरड्यातून व गुदद्वारातून रक्‍तस्‍त्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.

------

२ लाख ९७ हजार २९७ घरांना प्रत्यक्ष भेटी

आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी करण्यात येते. आरोग्यसेवकांकडून नागरिक साठवत असलेल्या पाण्यांची तपासणी करण्यात आली. गरज असल्यास त्यात औषधही टाकण्यात आले. २०२० मध्ये जिल्ह्यातीस २ लाख ९७ हजार २९७ घरांना भेटी देऊन पाण्याची तपासणी करण्यात आली. कोरोनामुळे नागरिकांनी स्वताची काळजी घेतली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वच्छतेचे महत्त्व जाणल्यामुळे यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे सहाय्यक हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdengueडेंग्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या