शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Good News; बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनासाठी ४६ कोटीचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 2:31 PM

अतिरिक्त भूसंपादनाकरिता मान्यता दिली : २९.९४ हेक्टरचे होईल भूसंपादन

सोलापूर : बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी ४६.२९ कोटी निधीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच अतिरिक्त २९.९४ हेक्?टरचे भूसंपादन होईल. यापूर्वी ५४९ हेक्टरचे भूसंपादन झालेले आहे. आता एकूण भूसंपादन ५८० हेक्?टर होईल. यापूर्वी ५७६ कोटी निधी मंजूर झाला आहे. एकूण भूसंपादन ५८० हेक्टर असून, याकरिता १२२ कोटी निधीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

बोरामणी व तांदूळवाडी या दोन गावांचा नकाशा एकत्र केल्याने अदर नकाशामध्ये काही गट नंबर आले नसल्याने ते संपादन करावयाचे राहिले. त्यामुळे सदर गट नंबर प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची येत असल्याने त्यातील सुमारे २९.९४ हेक्?टर क्षेत्र संपादित करणे आवश्यक झाले. त्यामुळे शासनाकडे अतिरिक्त भूसंपादनाकरिता अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. अतिरिक्त निधीकरिता आमदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावून अतिरिक्त निधीची मागणी केली. त्यानंतर यासंदर्भात अजित पवार यांनी पन्नास कोटी निधी देणार असल्याचे जाहीर केले. सदर निधीकरिता आदेश निघणे क्रमप्राप्त होते. २९ सप्टेंबरला राज्य सरकारने जीआर काढून ४६ कोटी रुपये निधीला मान्यता दिली. त्यामुळे बोरामणी विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

डिसेंबर २००८ मध्ये बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली. त्यानंतर २०१० मध्ये भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. पुन्हा २०१२ मध्ये भूसंपादनाच्या दुस?्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यानंतर आता आजपर्यंत अतिरिक्त भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित राहिला. येथील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे अतिरिक्त भूसंपादनाचाही प्रश्न आता मार्गी लागला आहे.अतिरिक्त भूसंपादनाकरिता ४६ कोटी निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सदर निधी लवकरात लवकर मिळाल्यास भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करता येईल. भूसंपादन प्रक्रियेनंतर विमानतळाच्या दुस?्या टप्प्याकडे एक पाऊल टाकता येईल.- सज्जन निचळव्यवस्थापक, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅग्स :SolapurसोलापूरAirportविमानतळGovernmentसरकार