Good News; सोलापूर जिल्ह्यात १० लाख डोसचा टप्पा पार; कोरोना आटोक्यात येतोय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 04:31 PM2021-08-03T16:31:50+5:302021-08-03T16:41:13+5:30

आणखी डोस मिळणार : शहरात आज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण

Good News; 10 lakh dose crossed in Solapur district; Corona is under arrest ...! | Good News; सोलापूर जिल्ह्यात १० लाख डोसचा टप्पा पार; कोरोना आटोक्यात येतोय...!

Good News; सोलापूर जिल्ह्यात १० लाख डोसचा टप्पा पार; कोरोना आटोक्यात येतोय...!

Next

सोलापूर : जिल्ह्यात सोमवारी दहा लाख डोसचा टप्पा पार झाला आहे. जिल्ह्यातील लस संपली असून, मंगळवारी डोस मिळणार आहेत, मात्र महापालिकेकडे शिल्लक असलेल्या कोव्हॅक्सिन डोसवर १७ केंद्रांवर गरोदर माता व जेईई, नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण होणार आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शहरात ७ लाख ८० हजार ६१८ तर ग्रामीण भागात २७ लाख ९७ हजार ४१४ असे ३५ लाख ७८ हजार ३२ लाभार्थी लसीकरणाला पात्र आहेत. यामध्ये २ ऑगस्टअखेर ७ लाख ४० हजार ४१८ जणांना पहिला तर २ लाख ५१ हजार ९५३ जणांना दुसरा डोस दिला होता. सरकारी ४६ व खाजगी १७ केंद्रांवर अशा ६३ केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी ग्रामीण भागात १३ हजार कोव्हॅक्सिनचे डोस ऑनलाइन देण्यात आले. यात अक्कलकोट व सांगोला तालुका वगळता इतर तालुक्यांत ऑनलाइन नोंदणी सकाळीच फुल्ल झाली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १२ हजार २१० जणांनी डोस घेतले. अशा प्रकारे सोमवारी १० लाख २ हजार ७८५ जणांना दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण झाले. यात पहिला डोस ७ लाख ५ हजार ३६१, तर दुसरा डोस २ लाख ५२ हजार ४२४ जणांनी घेतला आहे.

 

Web Title: Good News; 10 lakh dose crossed in Solapur district; Corona is under arrest ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.