तीनवेळा कोलांट्या खाऊन जीप खड्ड्यात नशीब बलवत्तर.. दहाजण सुखरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST2021-01-23T04:22:40+5:302021-01-23T04:22:40+5:30
अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी (एमएच ०६ बीई ९२८४) या जीपमधून नाविदगी येथून ९ ते १० जण कर्नाटकातील ...

तीनवेळा कोलांट्या खाऊन जीप खड्ड्यात नशीब बलवत्तर.. दहाजण सुखरुप
अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी (एमएच ०६ बीई ९२८४) या जीपमधून नाविदगी येथून ९ ते १० जण कर्नाटकातील रेवूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात तोळणूर - नागणसूर गावाच्या मध्यावर समोरून एक शेतकरी सायकलस्वार अचानकपणे जीप समोर आला. यामुळे जीपचालक सोमय्या स्वामी (वय ३८) याने शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जोरदार ब्रेक दाबला. यामुळे जीपने तीनवेळा कोलांटउड्या खाल्ल्या. मात्र नशीब बल्लवतर असल्याने जटेप्पा पुजारी (वय ७०), इरप्पा पुजारी (४५), निगप्पा पुजारी (५५), सोमय्या स्वामी (३८, सर्व राहा. नाविदगी, ता. अक्कलकोट) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना नागणसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून चालक मुस्तफा बिराजदार यांनी तत्काळ अक्कलकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
जीप खड्ड्यातून काढण्यासाठी शरणप्पा फुलारी यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची फिर्याद दाखल झाली नव्हती.
कोट
अपघात इतका भयानक होता की, जीप तीन वेळा खड्ड्यात पडली. मात्र आतील दहाजण सुखरूप बचावले. काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. केवळ नशीब बलवत्तर असल्यानेच ते वाचले. ते दृश्य बघून मी हादरून गेलो.
- मलप्पा रामपुरे, प्रत्यक्षदर्शी
फोटो: २२अक्कलकोट-ॲक्सीडेंट
अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर-नागणसूर रस्त्यावर तीनवेळा कोलांटउड्या खाऊन खड्ड्यात पडलेली जीप.