सोलापूरात ५० लाखांचा गुटखा जप्त, एक जण ताब्यात, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई़

By Admin | Updated: April 15, 2017 18:06 IST2017-04-15T18:06:40+5:302017-04-15T18:06:40+5:30

.

Golkha seized Rs 50 lakhs in Solapur, one person was arrested, Solapur taluka police action | सोलापूरात ५० लाखांचा गुटखा जप्त, एक जण ताब्यात, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई़

सोलापूरात ५० लाखांचा गुटखा जप्त, एक जण ताब्यात, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई़


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : हैदराबाद येथुन पुण्याकडे जाणारा बेकायदेशीर ५० लाखांचा गुटखा सोलापूर तालुका पोलीसांच्या पथकाने सोलापूर-हैदराबाद रोडवरील तांदुळवाडी परिसरातील किर्ती गोल्ड परिसरात पकडला़ याप्रकरणी एकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़
हैदराबाद येथुन पुण्याकडे निघालेला टेंम्पो एपी २९ टीसी ०४९८ यामधून बेकायदेशीर गुटखा वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीसांना मिळाली होती़ या माहितीच्या आधारे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास घुगे, पोलीस नाईक वानखेडे, पवार व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने तांदुळवाडी येथे सापळा लावला़ शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास सापळा लावला असता तांदुळवाडी परिसरात टेंम्पो ताब्यात घेतला़ यात चौकशी व तपासणी केली असता यात गोवा गुटख्याचे ५० मोठे पोते मिळून आले़ जप्त गुटख्याची ४३ लाख ३२ हजार तर टेम्पोची किंमत ७ लाख असा एकूण ५० लाख ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, विकास घुगे, वानखेडे, पवार यांनी केली़

Web Title: Golkha seized Rs 50 lakhs in Solapur, one person was arrested, Solapur taluka police action