सोने शुद्धता तपासणाऱ्या मशीनलाही दगा, बनावट सोनसाखळ्यांना हॉलमार्क शिक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:55+5:302021-02-05T06:45:55+5:30
ही टोळी राज्यभर असावी, अशी शक्यता व्यक्ती केली जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केलेली आहे. आणखी दोघे ...

सोने शुद्धता तपासणाऱ्या मशीनलाही दगा, बनावट सोनसाखळ्यांना हॉलमार्क शिक्का
ही टोळी राज्यभर असावी, अशी शक्यता व्यक्ती केली जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केलेली आहे. आणखी दोघे फरार आहेत. मात्र या प्रकरणाची व्याप्ती खोलवर असल्याने ग्रामीण पोलीस दलाकडून शोध घेतला जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी इस्माईल मणियार (सावळेश्वर), मनोज बनगर (पिसेवाडी, आटपाडी), बळी जाधव (भुताष्टे), श्रीगुरेलाल शर्मा (सांगली सराफकट्टा), नवनाथ सरगर (करनगी, आटपाडी या पाच जणांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळेश्वर येथील गंगा ज्वेलर्सचे मालक मारुती रेवणकर यांना गावातीलच दोघांनी बनावट सोन्याच्या साखळ्या देऊन ६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सूत्रे फिरविली आणि याची व्याप्ती वाढली आहे.
तपासानंतर अटक केलेल्या नवनाथ सरगर व योगेश शर्मा याला मोहोळच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता दिल्लीमधून बनावट सोन्याच्या साखळ्यावर हॉलमार्क लावून मोठ्या प्रमाणात खासगी बँका, पतसंस्था व सोनाराना फसवणाऱ्या टोळीचे हे रॅकेट राज्यभर असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
----
तपासासाठी पोलीस दिल्लीला जाणार
आता मोहोळ पोलिसांचे पथक या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी आणि बनावट साखळ्यावर हॉलमार्क लावून फसवणूक करणाऱ्या एजंटाचे धागेदोरे मुळापासून काढण्यासाठी लवकरच दिल्लीकडे कूच करणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.
----
दोघे अद्याप फरार
आतापर्यंत पोलिसांनी या टोळीतील इस्माईल इन्नुस मणियार, मनोज बनगर, बळीराम यादव, नवनाथ सरगर, योगेश शर्मा अशा पाच जणांना अटक केली आहे. तर बबलू ऊर्फ इसाक पठाण, सद्दाम ऊर्फ बबलू तांबोळी हे अद्याप फरार आहेत.
---
शुद्धता तपासणाऱ्या मशीनबद्दल प्रश्नचिन्ह
दिल्लीतून येणाऱ्याय सोनसाखळ्यावर २२ कॅरेट ९१.६ A SSJ असा हॉलमार्क आहे. ही साखळी सोन्याची शुद्धता तपासणाऱ्या मशीनमध्ये तपासली जाते. मगच २२ कॅरेट शुध्द असाच रिमार्क येतो. मात्र, साखळी वितळवली की सोने केवळ २० टक्केच मिळते, असे सांगण्यात येत आहे.
----