महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST2020-12-05T04:45:44+5:302020-12-05T04:45:44+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रिया व त्यांच्या दोन बहिणी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून नवीपेठ ...

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रिया व त्यांच्या दोन बहिणी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून नवीपेठ येथे जाण्यासाठी मुरारजी पेठ येथील सद्भावना बंगल्याजवळून निघाले़ बंगल्याजवळ गतिरोधक असल्याने त्यांनी मोटरसायकलचा वेग कमी केला असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून नेले. या घटनेचा पुढील तपास पोसई देशमाने करत आहेत.