शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ भेट वडीलकीच्या नात्याने, भाजपसोबत जाणे राष्ट्रवादीच्या धोरणात बसत नाही: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 06:01 IST

अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. काही लोक मोठ्या प्रमाणात माघारी येऊ इच्छितात, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क,  सोलापूर : भाजपची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणात बसत नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम असून भाजपबरोबर जाणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोला येथे पत्रकार परिषदेत मांडले. 

अजित माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितले तर मी आता कुटुंबात वडीलधारी आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी त्यांना भेटलो. या भेटीने माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, अशी भूमिका मांडून अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त बैठकीच्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकला.  

भाजपबरोबर युती करण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले की, भाजपबरोबर युती करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. काही लोक मोठ्या प्रमाणात माघारी येऊ इच्छितात. काही लोक म्हणतात की, आमच्याकडून जे झाले ते चुकीचे झाले. २०२४ पर्यंत काही बदल होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ईडीला उत्तर देण्यास समर्थ

ईडी नोटिसीसंदर्भात पवार म्हणाले की, आजची राजकीय परिस्थिती विचित्र झालेली आहे. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सत्ताधारी ईडी, सीबीआय यांच्या नोटीस पाठवत आहेत. अशा नोटिसांना तोंड देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत.    

राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही : जयंत पाटील

पंढरपूर : राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नाही. सर्व ठिकाणी शरद पवारांचे फोटो असतात. सगळे पवार यांचेच नेतृत्व मान्य करतात, असे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगोला येथे स्पष्ट केले. ते म्हणाले की, माझ्या भावाला ईडीची नोटीस आली हे खरे आहे. परंतु, त्याचा व कालच्या पुणे येथील भेटीचा काही संबंध नाही. कोण कोणाला कधीही कुठेही भेटू शकतो.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस