शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे मुख्यमंत्री सोलापुरात; भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 11:43 IST

दरम्यान, आज दिवसभर सावंत हे सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहोळ, पंढरपूरला भेटी देणार आहेत.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आजपासून दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बुधवार २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचे विमानतळावर आगमन झाले. प्रारंभी सोलापूर विमानतळावर आ. सुभाष देशमुख, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी त्यांचे स्वागत केले. 

दरम्यान, आज दिवसभर सावंत हे सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहोळ, पंढरपूरला भेटी देणार आहेत. या भेटीत ते राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, भाजपाचे आमदार सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. शिवाय शिवसेनेच्या संपर्क कार्यालयास ते भेट देऊन शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त यांच्या भेटी घेणार आहेत. 

असा आहे त्यांचा दोन दिवसाचा दौरा...

२२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. दुपारी १२ वाजता अनगर (ता. मोहोळ) येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या घरी भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता माढा येथील एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला भेट देऊन देवदर्शन करणार आहेत. तेथून ते परत माढा येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजता शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी,  रात्री ७ वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरी ते रात्रीचे जेवण करणार आहेत. तेथून ते सोलापुरात येऊन मुक्काम करणार आहेत.

२३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर विमानतळाहून कोल्हापूरकडे जाणार आहेत. साडेनऊ वाजता कोल्हापूर येथील श्री. महालक्ष्मी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर टेंबळाईवाडी, कनेरी मठातील येथील सिध्देश्वर मंदीरात दर्शन घेऊन ते कोल्हापूर विमानतळाहून गोव्याकडे प्रयाण करणार आहेत.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाSolapurसोलापूर