पोलीस ठाण्यात जाऊन हवालदाराला मारहाण

By Admin | Updated: June 10, 2017 02:48 IST2017-06-10T02:48:19+5:302017-06-10T02:48:19+5:30

फिर्याद दाखल करून घेतल्याने युवकाने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोलापुरात घडली. या युवकाने पोलीस ठाण्यात तोडफोडही केली.

Go to the police station and hit the constable | पोलीस ठाण्यात जाऊन हवालदाराला मारहाण

पोलीस ठाण्यात जाऊन हवालदाराला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : फिर्याद दाखल करून घेतल्याने युवकाने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोलापुरात घडली. या युवकाने पोलीस ठाण्यात तोडफोडही केली.
विशाल विष्णू वाघमारे (वय ३१ रा. जोशी गल्ली) असे त्याचे नाव आहे. हवालदार तुषार गोविंद भोई यांनी फिर्याद नोंदवून घेतली होती. याचा राग मनात ठेवून वाघमारे हा साखर पेठ पोलीस चौकीत आला. त्याने खोटा गुन्हा का दाखल केला म्हणून भोई यांची गचांडी पकडली. त्यांच्याशी झोंबाझोंबी केली. चौकीतील टी. व्ही. बॉक्स आणि इतर साहित्याची तोडफोड केली.
वाघमारे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Go to the police station and hit the constable