अनगरमध्ये शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:00+5:302021-09-10T04:29:00+5:30

अनगर : बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शिक्षकांचा गौरव शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे ...

The glory of teachers in Angar | अनगरमध्ये शिक्षकांचा गौरव

अनगरमध्ये शिक्षकांचा गौरव

अनगर : बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शिक्षकांचा गौरव शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या हस्ते झाला.

यावेळी शितोळे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करत शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम आदर्श पिढी घडवून राष्ट्र उभारणीत करण्यात शिक्षकांचा वाटा मोलाचा असतो, असे मत व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार राजन पाटील, प्राचार्य चंद्रकांत ढोले, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष रंगसिद्ध दसाडे, डॉ. संजय करंडे, डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक विश्वजित लटके, राम कदम, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, प्राचार्य पृथ्वीराज करंडे, प्राचार्य तुळशीदास ढेरे उपस्थित होते. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले, तर माधव खरात यांनी आभार मानले.

----

फोटो : ०९ अनगर

अहमदनगर सिद्ध शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार राजन पाटील, जयकुमार शितोळे, रंगसिद्ध दसाडे, प्राचार्य चंद्रकांत ढोले, चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. संजय करंडे, विश्वजित लटके, रामचंद्र पाटील.

Web Title: The glory of teachers in Angar