रत्नत्रय पतसंस्थेचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:16 IST2021-01-01T04:16:34+5:302021-01-01T04:16:34+5:30

माळशिरस : सदाशिव नगर येथील रत्नत्रय पतसंस्थेचा उद्योजक अनंतलाल दोशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या ...

Glory to Ratnatraya Patsanstha | रत्नत्रय पतसंस्थेचा गौरव

रत्नत्रय पतसंस्थेचा गौरव

माळशिरस : सदाशिव नगर येथील रत्नत्रय पतसंस्थेचा उद्योजक अनंतलाल दोशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास १४ कोटींच्या ठेवी असून, यशस्वी वाटचाल सुरू आहे. या संस्थेतून विविध ऑनलाईन सेवासुविधा दिल्या जात आहेत. या संस्थेच्या वतीने सभासदांना डीडी काढणे, आरटीजीएस, एनईएफटीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, वीज बिल भरणा अशा विविध सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुरविल्या जात आहेत. यावेळी संस्थेचे चेअरमन वीरकुमार दोशी, संचालक प्रमोद दोशी, प्रभाकर गायकवाड, अजय गांधी, जगदीश राजमाने, संजय दोशी, रामदास गोफणे, रत्नत्रय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अमित पाटील, संस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत, सागर ओवाळ यांची उपस्थिती होती.(वा. प्र.)

---

फोटाे : ३१ रत्नत्रय पतसंस्था

रत्नत्रय पतसंस्थेचा गौरव करताना अनंतलाल दोशी. यावेळी वीरकुमार दोशी, प्रमोद दोशी, अजय गांधी.

Web Title: Glory to Ratnatraya Patsanstha