सुहास उरवणे यांचा जीवन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:28 IST2021-09-08T04:28:29+5:302021-09-08T04:28:29+5:30

अकलूज : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा निमगाव (म) येथील उपक्रमशील आदर्श शिक्षक सुहास उरवणे यांना महाराष्ट्र राज्य ...

Glory to the life of Suhas Urvane | सुहास उरवणे यांचा जीवन गौरव

सुहास उरवणे यांचा जीवन गौरव

अकलूज : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा निमगाव (म) येथील उपक्रमशील आदर्श शिक्षक सुहास उरवणे यांना महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी वीरशैव कल्याणकारी संघटनेच्या वतीने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सोलापूर येथे शिक्षक दिनी खा.जय सिद्धेश्वर महास्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माळेवाडी बोरगाव या शाळेमध्ये कार्यरत असताना संगणक, प्रिंटर वॉश बेसिन माध्यमातून जवळपास दोन लाख रुपयांचे शैक्षणिक कार्य केले. सध्या जिल्हा परिषद शाळा निमगाव (म) येथे कार्यरत असून, मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत.

----

फोटो : ०७ सुहास उरवणे

वीरशैव कल्याणकारी संघटनेच्या वतीने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सुहास उरवणे यांना गौरविताना, खा.जय सिद्धेश्वर महास्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी.

060921\2402img-20210906-wa0137.jpg

सुहास उरवणे यांना जीवन गौरव'पुरस्कार देऊन सन्मानित करताना खा.जय सिद्धेश्वर महास्वामी

Web Title: Glory to the life of Suhas Urvane