शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

पहिली उचल तीन हजार रूपये द्या, ऊसदराबाबत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:37 IST

माढा तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असून ५ साखर कारखाने आहेत. पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी, या मागणीवर सर्व शेतकरी संघटना ठाम असल्याने संघटनेचे नेते जोमात तर शेतकरी मात्र कोमात अशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देसंघटनांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या कारखानदारांना परवडत नाहीतआंदोलनामध्ये स्वाभिमानी, बळीराजा, प्रहार आदी संघटना अग्रभागी महिनाभर आंदोलने करुन देखील पदरात काही पडत नसल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

 इरफान शेख कुर्डूवाडी दि १६ : माढा तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असून ५ साखर कारखाने आहेत. पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी, या मागणीवर सर्व शेतकरी संघटना ठाम असल्याने संघटनेचे नेते जोमात तर शेतकरी मात्र कोमात अशी अवस्था झाली आहे. तर इकडे संघटनांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या कारखानदारांना परवडत नाहीत, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. परतीचा मान्सून जोरदार बरसल्याने अगोदरच हंगाम महिनाभर उशिरा सुरू झाला आहे.  त्यातच भविष्यात होणाºया अवकाळी पावसाची भीती, वाढत्या उन्हामुळे घटणारे टनेज, वेळेवर ऊस गेल्यावर खोडवा चांगला फुटतो यासाठी ऊस घालवायची धडपड ऊस उत्पादक करताना दिसून येत आहे; मात्र चाणाक्ष शेतकरी आपला ऊस वेळेवर जावा त्यानंतर आंदोलन तीव्र व्हावे, आपल्याला वाढीव दर मिळावा व सत्ताधाºयांबरोबरचीही सलगी कायम रहावी अशी दुहेरी चाल खेळताना दिसून येत आहेत.यावर्षी सुरुवातीलाच लागणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पुढील वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न उद्भवणार आहे. आपला खोडवा, निडवा जाईल का नाही, यामुळे कारखानदारांचा रोष न पत्करलेला बरा ही मानसिकता गेटकेन ऊस उत्पादकांची झाली आहे. आंदोलनामध्ये स्वाभिमानी, बळीराजा, प्रहार आदी संघटना अग्रभागी आहेत तर जनहित, रयत क्रांती सेना, भूमाता, रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटना आदींनी निवेदने देऊन वातावरण तापत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महिनाभर आंदोलने करुन देखील पदरात काही पडत नसल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत.  सहकारमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन, रक्तदान शिबीर, त्यांच्या दोन्ही साखर कारखान्यांपुढे घंटानाद आंदोलन करण्यासाठी बहुसंख्येने सोलापूरला उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते करीत आहेत. सहकारमंत्री व पालकमंत्री यांच्यातील किनारही दिसून येत आहे अंतर्गत मतभेदाचे राजकारण शेतकरी प्रश्नाच्या बाबतीत तरी करु नये, अशी भावना सामान्य शेतकºयांची आहे.----------------------मगच ऊसतोड करु द्या- शासन जो दर ठरवेल तो देण्यास आम्ही बांधिल आहोत. शेतकºयांनी ऊस गाळपासाठी द्यावा, संघटनांनी शांततेच्या माध्यमातून आंदोलने करावीत, वाहतूकदारांचे नुकसान टाळावे, असे आवाहन कारखानदार करीत आहेत, तर संघटना केवळ साखरेच्या भावाचाच विचार न करता मोलॅसिस, बगॅस, इथेनॉल, को-जनरेशन या माध्यमातून मिळणाºया उत्पादनाचा हिशोब शेतकºयांना पटवून देत आधी दर जाहीर करा मगच ऊस तोड करु द्या, असे आवाहन शेतकºयांना करीत आहेत.