उसाची पहिली उचल अडीच हजार द्या, अन्यथा तीव्र आंदोलन; सेनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:00+5:302020-12-05T04:44:00+5:30
सर्व साखर कारखानदारांनी संगनमत करून शेतकऱ्यांचा ऊस फक्त दोन हजार रुपये प्रतिटन प्रमाणे घेण्याचा डाव आखला आहे. गतवर्षी ...

उसाची पहिली उचल अडीच हजार द्या, अन्यथा तीव्र आंदोलन; सेनेचा इशारा
सर्व साखर कारखानदारांनी संगनमत करून शेतकऱ्यांचा ऊस फक्त दोन हजार रुपये प्रतिटन प्रमाणे घेण्याचा डाव आखला आहे. गतवर्षी २७ रुपये साखरेचा भाव असताना शेतकऱ्यांना कारखान्यांनी पहिला हप्ता २२०० ते २५०० रुपयांपर्यंत दिला पण आता यावर्षी एकही साखर कारखानदार तोंड उघडायला तयार नाही. यावर्षी उसाचे उत्पादन भरपूर असल्यामुळे कारखानदारांना वाटते ऊस उत्पादक जातोय कुठे यावर्षी साखरेला ३१ ते ३२ रुपये रुपये भाव आहे.उसापासून मिळणारे आणि उत्पादन याचा सर्व विचार करता शिवाय शासनाने निर्माण केलेल्या सत्तर तीसच्या फार्म्युल्यानुसार २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्यात काहीच अडचण नाही.
या आंदोलनात प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनहित शेतकरी संघटना या सर्व संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन संघर्ष करणार असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे.
----